-->
करमाळाराजकियसामाजिक

तालुक्यात प्रत्येक गावात शिवसेना महिला आघाडी ची शाखा काढणार- प्रियांकाताई गायकवाड

शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या हस्ते झाला सत्कार!!!

 

प्रतिनिधी/ अंगद भांडवलकर

करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावात व शहरातील प्रत्येक वार्डात महिला आघाडीचे संघटन मजबूत करणार असून महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार दूर करण्यासाठी शिवसेना महिला आघाडी कायम कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही महिला आघाडीच्या नूतन तालुकाध्यक्ष प्रियांकाताई गायकवाड यांनी दिली. प्रियांकाताई गायकवाड यांची करमाळा तालुका शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाली असून शिवसेना नेत्या व महिला आघाडीच्या सोलापूर संपर्क नेत्या संजना घाडी यांनी या निवडीचे पत्र दिले आहे. या निवडीबद्दल करमाळा तालुक्यातील शिवसेनेच्या वतीने गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपतालुकाप्रमुख दादा तनपुरे, उपशहरप्रमुख अविनाश भिसे, युवा सेना नेते राहुल कानगुडे, माजी शहरप्रमुख संजय शीलवंत, माजी उपशहरप्रमुख राजेंद्र काळे, प्रसाद निंबाळकर, युवा शहरप्रमुख विशाल गायकवाड, पत्रकार सागर गायकवाड, किल्ला विभाग शाखाप्रमुख नागेश गुरव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की, शिव संपर्क अभियानाच्या माध्यमातून सर्व घराघरात जाऊन महिला सक्षम करण्यासाठी महिला आघाडीने प्रयत्न करावेत. त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

नगरपालिका निवडणूक शिवसेना लढविणार!!!
करमाळा नगरपालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार असून वेळप्रसंगी जे सोबत येथील त्यांच्याशी युती करण्याची सुद्धा शिवसेनेची तयारी आहे.             -उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे .

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close