प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्यातील सर्वात मोठ्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटी वांगी ची चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची आज बिनविरोध निवड होऊन चेअरमन पदी डॉक्टर विजय गोपाळ रोकडे यांची तर व्हाईस चेअरमन पदी भैरवनाथ शंकर बंडगर यांची निवड करण्यात आली.
आज सोमवार दिनांक २३ मे रोजी सन २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी ही निवड पार पडली. काही दिवसापूर्वी वांगी ब्रहत विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे पंचवार्षिक निवडणूक होऊन त्यामध्ये स्थानिक जय भवानी शेतकरी विकास पॅनलचे १३ पैकी १३ संचालक भरघोस मतांनी निवडून आले होते.
त्यानंतर आज संस्थेच्या चेअरमन पदी डॉक्टर विजय रोकडे तर व्हाईस चेअरमन पदी भैरवनाथ बंङगर यांची बिनविरोध निवड पार पडली .यावेळेला नवनिर्वाचित सर्व संचालक उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक दीपक तिजोरे यांनी काम पाहिले. या निवडीनंतर ग्रामस्थांच्यावतीने नूतन चेअरमन, व्हाईस चेअरमन व नवनिर्वाचित सर्व संचालकांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी आदिनाथ चे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख व बाजार समितीचे सभापती प्रा. शिवाजी बङगर यांनी नूतन संचालक मंडळाला च्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी आदिनाथचे संचालक पांडुरंग जाधव, मकाईचे संचालक संतोष देशमुख, आदिनाथचे माजी संचालक भारत साळुंके, संचालक बापूराव देशमुख, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष महेंद्र पाटील, बाजार समितीचे संचालक बापूराव रणसिंग, माजी पं.स. सभापती प्रतिनिधी लक्ष्मण महाडिक, माजी पं.स. सदस्य सुहास नाना रोकडे, युवराज रोकडे, पप्पू रोकडे, धनंजय गायकवाड, तानाजी देशमुख, दत्ता बापू देशमुख, वांगीचे माजी सरपंच प्रतिनिधी विठ्ठल शेळके, वैभव पाटील, सुधीर देशमुख, गणेश पाटील, माजी चेअरमन साहेबराव रोकडे, रामेश्वर तळेकर, देविदास तळेकर, गणेश तळेकर, अर्जुन आबा तकीक, सुरेश भानवसे, विकास पाटील, आप्पासाहेब भोसले, नितीन देशमुख, उमेश पाटील, सुधीर देशमुख, गणेश जाधव, विशाल तकिक, नितीन तकिक, उस्मान पटेल, नाना भानवसे, लक्ष्मण महाडीक, हनू यादव, पैलवान आप्पासाहेब चौगुले, अनिल बोरकर, डॉक्टर भाऊसाहेब शेळके, उपसरपंच हिराजी चौगुले, काकासाहेब बोरकर, आप्पा साहेब भोसले, बाबासाहेब चौगुले, नागनाथ मंगवडे, दशरथ देशमुख, काकासाहेब भानवसे, जलाल पटेल, पांडुरंग देशमुख, युवराज दिवटे, गणेश जाधव, नानासाहेब भानवसे, नामदेव महाडिक, रविराज देशमुख, बापूराव आरकिले, भैय्या वाघमोडे, मयुर रोकडे, सोमनाथ रोकडे, गणपत कापसे, पोपट सातव, चंद्रकांत देशमुख, बिटरगाव ग्रामपंचायतीचे सदस्य प्रदीप भोसले, नामदेव सरडे इत्यादी उपस्थित होते. आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव दत्तात्रय शिर्के यांनी केले.




