-->
करमाळाराजकियसामाजिक

प्रत्येक शासकीय कार्यालयात शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा लावाव्यात :- शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

महापुरुषांच्या यादीत स्व. प्रबोधनकार ठाकरे व शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा समावेश करण्यात आला असल्याने प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालयात शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे व प्रबोधनकार ठाकरे यांचे फोटो लावावेत आशी मागणी शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे यांनी तहसीलदार समीर माने यांच्या कडे लेखी निवेदना द्वारे केली आहे .

या वेळी अधीक बोलताना फरतडे म्हणाले की
की १४ जानेवारी 2021 रोजी महाविकास आघाडी सरकारने थोर महापुरुषांच्या संदर्भात नवीन सुधारित यादी जाहीर केली असून या मध्ये स्व. प्रबोधनकार ठाकरे , शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा समावेश केलेला आहे .

राज्य शासनाचा आदेश असताना करमाळा तालुक्यातील एकाही शासकीय निमशासकीय कार्यालयात प्रबोधनकार ठाकरे व शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेस अभिवादन करण्यात येत नाही तसेच अनेक शासकीय निमशासकीय कार्यालयात शासन आदेशा प्रमाणे बंधनकारक असताना देखील शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे व प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमा देखील नाहीत हि बाब गंभीर असल्याचे फरतडे यांनी निवेदनात म्हटले आहे.

लवकरात लवकर सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात स्व. बाळासाहेब ठाकरे व प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमा लावाव्यात व येणाऱ्या जानेवारीत महिन्यात 23 जानेवारी रोजी असलेली शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जंयती साजरी करावी अन्यथा शिवसेना स्टाइल ने आंदोलन केले जाईल असा इशारा देखील फरतडे यांनी दिला आहे.

सदर निवेदन नायब तहसीलदार जाधव साहेब यांनी स्विकारले

पंचायत समितीतीत शिवसेनेची सत्ता असुन शासनाच्या आदेशाची वाट न पाहता या ठिकाणी शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्ये फोटो लागतील असे अपेक्षित होते, मात्र पाच वर्षे संपत आली तरी या कार्यालयात शिवसेना प्रमुख व पक्षप्रमुख यांचे फोटो लागले नाहीत हे दुर्दैव आहे. किमान शासकीय आदेशाचे पालन करून आता तरी फोटो लावले जातील असी अपेक्षा आहे.
शाहुराव फरतडे शिवसेना माजी तालुकाप्रमुख

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close