-->
करमाळासामाजिक

वृक्षारोपण करून मॅजेस्टीक मॅनहॅटन सोसायटीत महाराष्ट्र दिन साजरा

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

आज रविवार दि. ०१ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त वाघोली येथिल मॅजेस्टीक मॅनहॅटन सोसायटी मध्ये निसर्ग संवर्धनासाठी वृक्षारोपण करण्यात आले. सकाळी प्रथमतः माजी पुणे जिल्हा परिषद सदस्य श्री. रामभाऊ दाभाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर सोसायटी आवारात आंबा, लिंबु, नारळ, आवळा, चेरी, पेरू, मोहगनी, पाम या झाडांचे सोसायटीतील सामाजिक कार्यकर्त्यांच्या, बालसवंगड्यांच्या, उपसरपंच महेंद्रशेठ भाडळे व मा. जिल्हा परिषद सदस्य श्री. रामभाऊ दाभाडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

काही दिवसापूर्वी सोसायटीतील काही सभासद आणि कमिटी मेंबर यांनी सोसायटी संदर्भातील अडचणींसाठी उपसरपंच मा.श्री. महेंद्रशेठ भाडळे यांची भेट घेतली होती. यामध्ये सोसायटीच्या आवारातील ग्राउंड स्वच्छ व लेव्हल करून घेणे, हॉलीबॉल ग्राऊंड तयार करणे आणि जॉगिंग ट्रॅक संदर्भात विनंती करण्यात आली होती. त्याप्रमाणे महेंद्र शेठ यांनी विनंतीला मान देऊन ग्राऊंडचे काम, स्वच्छता व लेव्हल स्वखर्चातून करून घेतले. त्याचबरोबर महाराष्ट्र दिनानिमित्त वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पृथ्वी वर होणारी वाढती तापमान वाढ लक्षात घेतां हा उपक्रम खरोखर आदर्श निर्माण करणारा आहे. माननीय उपसरपंच महेंद्रशेठ भाडळे यांनी सर्व उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा देवून आभार व्यक्त केले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close