-->
करमाळासामाजिक

आ. संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नांना यश; कुकडी कालवा भूसंपानासाठी २०२१-२२ करिता विक्रमी २८ कोटी निधी उपलब्ध

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

रस्ते, पाणी, वीज आदी प्रश्नांबरोबरच करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी भूसंपादन, पुनर्वसन व प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना पर्याय जमिनीचे वाटप या विषयांचा वारंवार पाठपुरावा केल्यामुळे सन २०२१-२२ या वर्षाकरिता कुकडी भूसंपादनासाठी विक्रमी आर्थिक तरतूद झाल्याची माहिती कुकडी कालवा वितरण विभाग चे कार्यकारी अभियंता श्री. जगताप यांनी दिली.

सन २०२१-२२ करिता मार्च अखेर प्रथम ७ कोटी ३५ लाख व नंतर २० कोटी ७१ लाख असा एकूण २८ कोटी ६ लाख निधी कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून मिळाला आहे. जवळपास २० वर्षापासून करमाळा तालुक्यातील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना एक रुपयाचाही भूसंपादन मोबदला मिळालेला नव्हता. आमदार शिंदे यांनी याविषयी कृष्णा खोरे महामंडळाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे तालुक्यातील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला मिळण्यास मदत होणार आहे.

२०२१-२२ च्या प्राप्त निधीमधून करमाळा तालुक्यातील मौजे करमाळा ग्रामीण, सावडी, झरे, जातेगाव, पोथरे, रावगाव, कुंभारगाव, कामोणे, पोंधवडी येथील शेतकऱ्यांना भूसंपादन मोबदला मिळणार आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close