-->
करमाळाराजकियसामाजिक

शेवटच्या श्र्वासापर्यंत आ. संजय शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली जनतेची सेवा करणार- सुजित बागल

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

मांगी (ता.करमाळा) येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. सुजित बागल यांचे प्रयत्नातून व आमदार श्री. संजय शिंदे यांचे आमदार निधीतून दिनांक २७ मार्च रोजी मांगी येथील पंचशील बुद्धविहार व रेणुका माता मंदिर परिसरात दोन हायमॅक्स दिवे बसविण्यात आले. त्यानिमित्त पंचशील बुद्ध विहार कमिटीच्या वतीने श्री. सुजित बागल यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पुढे बोलताना श्री. बागल म्हणाले की, आमदार संजय शिंदे यांच्या कामाची पद्धत ही सर्वांना परिचित आहे. कोणताही गट तट न पाहता आमदार संजय मामा हे जनतेचे प्रश्न सोडवत आहेत. कार्यकर्त्यांसह विरोधकांच्या अडीअडचणी असतील त्या आ. शिंदे पुढे होऊन मार्गी लावतात. त्यामुळे आमदार संजय शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्षे स्वतःला सामाजिक कार्यात झोकुन देऊन जनतेची अहोरात्र, निस्वार्थी सेवा करत आहे. जास्तीत जास्त विकास कामांवर भर देत मांगी- जातेगाव शिव रस्ता मुरूम व खडीकरण साठी १०लाख, मांगी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर जीर्णोद्धार साठी १० लाख, मांगी- दक्षिण वडगाव मुरूम व खडीकरणं १० लाख, मांगी शिवारात हनुमंत माळी वस्ती मुरमीकरण असा भरगोस निधी आमदार शिंदे यांचे मार्फत आणला असून या विकास कामांची लवकरच सुरवात करण्यात येणार आहे.

आ. संजय शिंदे यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून सुजित बागल यांची ओळख आहे. संजय शिंदे आमदार नसताना ही त्यांचे मार्गदर्शनाखाली तालुक्यातील अनेक गावात विकास कामे राबविण्याचे काम सुजित बागल यांनी केले आहे. गेली अनेक वर्षे मांगी येथील पंचशील बुद्ध विहारसाठी हायमॅक्स बसवण्याची प्रलंबित असणारी मागणी श्री. सुजित बागल यांनी पूर्ण केल्याबद्दल कमिटीचे सदस्य व घुमटवाडी येथील सुजित बागल मित्र परिवार यांचे तर्फे या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कमिटी अध्यक्ष नवनाथ अवचर, उपाध्यक्ष अजिनाथ चव्हाण, सेक्रेटरी शहाजी अवचर, खजिनदार महेंद्र अवचर, सदस्य रोहन अवचर, प्रवीण अवचर, शुभम अवचर, प्रेम चव्हाण, हर्षल अवचर, संतोष चव्हाण तसेच लालासाहेब बागल, तात्या कोळी, श्री. रामसे, शाम पवार, शांतीलाल शिंदे, नितीन शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close