-->
आरोग्यकरमाळासामाजिक

करमाळा तालुक्यातील घारगांव येथे मोफत डोळे तपासणी शिबीर संपन्न

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

करमाळा तालुक्यातील मौजे घारगाव येथे बुधराणी हॉस्पिटल कोरेगाव पार्क पुणे, घारगाव ग्रामपंचायत तसेच महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना करमाळा तालुका शाखा यांच्यावतीने मोफत डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. ग्रामपंचायत कार्यालय घारगाव येथे सोमवार दिनांक २८ मार्च २०२२ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी १२:०० या वेळेत मोफत मोतीबिंदू, काचबिंदू ऑपरेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १०२ नागरिकांनी आपला सहभाग घेत या उपक्रमाचा लाभ घेतला.

यावेळी डॉ. हजारे मॅडम, घोडके मॅडम, ग्रामसेवक श्री. रवींद्र काळे, रा.स.प. करमाळा तालुकाध्यक्ष राज शेट्टी देशमुख, श्री. किरण पाटील, माजी सरपंच रामलीग देशमुखे, माजी सरपंच सौ. अनिता राजेंद्र भोसले, सरपंच अंगद नाना पवार उपसरपंच, सौ. लोचना नवनाथ पाटील, माजी सरपंच सौ. लक्ष्मी संजय सरवदे, महादेव दाजी होगले, श्री. दत्तात्रय मस्तूद, सर्व ग्रामपंचायत सदस्य संजय सरवदे, हौसराव गायकवाड, दगडू गायकवाड, विजय शिंदे, कल्याण शिंदे, तुकाराम ढिसले, कल्याण होगले, नानासाहेब पाटील, केदार पाटील, मधुकर गायकवाड, ईश्वर गायकवाड, रावसाहेब ढिसले, पोपट पाटील, नामदेव शिंगटे, अरुण शिंगटे, काशिनाथ वायकुळे, राजाभाऊ पवार, मुरलीधर होगले, सेवक होगले, हिरालाल गायकवाड, पप्पू गायकवाड, भीमराव पवार, साहेबराव पवार, हिरालाल पवार, दत्तात्रय अडसूळ, सुदाम होगले, ब्रह्मदेव काळे, शिपाई मुकेश मस्तूद आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संजय सरवदे यांनी केले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close