-->
करमाळाकृषी विषयकमाहिती विषयक

कुगाव येथे महिला दिनानिमित्त कृषी विभागाकडून महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन

 

 

प्रा. मनोज बोबडे

 

 

हनुमान जन्मभूमी कुगाव ता. करमाळा येथे दिनांक ०८ मार्च २०२२ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महिला शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या महाडीबीटी अंतर्गत सर्व योजना, फळबाग लागवड, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना अशा शासनाच्या सर्व योजना तसेच केळी व पपई या पिकाविषयी मार्गदर्शन करमाळा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन करण्यात आले. महिला शेतकरी व कृषी विभागातील कर्मचाऱ्यांकडून कुगाव येथे वृक्षारोपण करून महिला दिन साजरा करण्यात आला.

 

 

कुगाव व पंचक्रोशीतील महिलांना कृषीविषयक शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच गावातील महिलांकडून वृक्ष लागवड करून त्यांना विविध वृक्षांविषयी माहिती व त्यापासून आपणास मिळणारे विविध फायदे यांचीही माहिती दिली. औषधी वनस्पती, फळझाडे, सावलीची झाडे व आरोग्यदृष्ट्या महत्वपूर्ण वृक्ष लागवड का करावी याचे योग्य ते मार्गदर्शन रोहिणी सरडे मॅडम यांनी उपस्थित महिलांना केले.

 

 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रगतशील, प्रयोगशील शेतकरी श्री. धुळाभाऊ कोकरे, कृषी अधिकारी श्री. देवराव चव्हाण, कृषी पर्यवेक्षक श्री. मधुकर मारकड साहेब, श्री. नाना बेरे साहेब, श्री. कोकरे साहेब व कृषी विभागाच्या महिला कृषी सहाय्यक रोहिनी सरडे मॅडम व पंचक्रोशीतील महिला शेतकरी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close