-->
करमाळामाहिती विषयक

बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करावा; दिग्विजय बागल यांची वन विभागाकडे मागणी

 

करमाळा/प्रतिनिधी

 

मांगी (ता. करमाळा) येथील नागेश बागल यांच्या गाईचे वासरू बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले आहे. यामुळे मांगी, पोथरे परिसरतील शेतकरी व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. मागच्या अंजनडोह येथील नरभक्षी बिबट्याने केलेल्या हल्याच्या कटू आठवणी ताज्या असून त्यामूळे प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी. अशी मागणी मकाई कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी केली आहे. या घटनेची तातडीने गंभीर दखल घेऊन सोलापूर वन विभाग अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली. तसेच राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री मा.ना. सुधीर मुनगंटीवार यांना इ मेल द्वारे संपर्क साधून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची विनंती केली आहे.

 

मोहोळ आणि सोलापूर येथील वन अधिकारी यांनी नागेश बागल यांच्या वासरावर हल्ला केला त्या घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी दिग्विजय बागल यांनी वन परिक्षेत्रपाल लटके साहेब आणि त्यांच्या सहकारी अधिका-यांशी चर्चा करून पिंजऱ्यांची संख्या वाढवावी. तसेच ड्रोनद्वारे बिबट्याचा शोध घेऊन ग्रामस्थांना तात्काळ दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे. ग्रामस्थांनीही घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी. असे आवाहन देखील दिग्विजय बागल यांनी केले.

 

यावेळी वन अधिकाऱ्यांकडून देखील नागरीकांना खबरदारी म्हणून मशाल, काठी वापरावी तसेच रात्री विनाकारण बाहेर पडू नये. अशा प्रसंगी धैर्याने तोंड द्यावे अशा सूचना केल्या. तसेच दिग्विजय बागल यांनी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्याची ही मागणी केली असता लवकरच तसा प्रस्ताव पाठवू असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

 

यावेळी मांगी ग्रामस्थांसोबत अमित बागल, किशोर बागल अभिजीत बागल, नागेश बागल, डॉ. धनराज देवकर, तात्या बागल, पोलीस पाटील आकाश शिंदे तसेच तालुका पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close