
प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


“मनामनात शिवराय – घरा घरात शिवराय” या संकल्पनेतुन जय भवानी – जय शिवाजीच्या गगनभेदी जयघोषात फुलगाव, ता. हवेली येथे मोठ्या उत्साहात एक गाव एक शिवजयंती साजरी करण्यात आली होती. यावेळी संपूर्ण गाव व वाड्यावस्त्यावर भगवे ध्वज लावण्यात आले होते.
शौर्यपाठ श्रीक्षेत्र तुळापूर ते फुलगाव शिवज्योत शिवभक्तांच्या वतीने आणण्यात आली. तर माळवाडी येथे सर्वप्रथम शिवज्योतीचे पूजन सरपंच मंदानानी साकोरे, उपसरपंच ज्योती गवारे, ग्रामपंचायत महिला पदाधिकारी व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पारंपरिक पद्धतीने यावेळी गावातून शिवज्योतीची मिरवणूक काढण्यात आले. यावेळी ज्योतीचे सर्वच चौकात महिलांच्या वतीने स्वागत करण्यात आले. तर यंदा मनामनात शिवराय – घराघरात शिवराय या संकल्पनेतून ग्रामस्थांसाठी भव्य शिवमहोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सहभागी स्पर्धकांनी घरात छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा, आरस तसेच घरावर भगवे ध्वज लावून स्पर्धेत सहभाग नोंदविला. तर प्रत्येकाने घरासमोर रांगोळी काढून शिवज्योतीचे स्वागत केले. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. एक गाव एक शिवजयंती चे नियोजन गावातील आजी माजी पदाधिकारी व शिवभक्तांनी संयुक्तरित्या केले.




