
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


महाराष्ट्र राज्य को. ऑप. मार्केटींग फेडरेशन यांचे वतीने विठ्ठल सर्वसाधारण सह. संस्थेव्दारे करमाळा तालुक्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची सोय व वाजवी दाम मिळणेसाठी आमदार संजयमामा शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रयत्नातून शासनाच्या आधारभूत किंमत योजने अंतर्गत हरभरा खरेदी साठी ऑनलाईन नोंदणी सुरु झाल्याची माहिती संस्थेचे सचिव सुजीत बागल यांनी दिली आहे.
हरभर्याला हमीभाव दर प्रतिक्विंटल रुपये ५२३० इतका आहे. तरी शेतकर्यांनी ७/१२ उतारा, ८अ, पिकपेरा, आधार लिंक असलेले बँक पासबुक झेरॉक्स, आधारकार्ड झेरॉक्स आदी कागदपत्रांसह संस्थेच्या करमाळा मार्केट यार्ड येथील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक शेजारील कार्यालयात ऑनलाईन नोंदणी करावी. असे आवाहन संस्थेचे व्यवस्थापक आदिनाथ मोरे यांनी केले आहे.
करमाळा तालुक्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय हमीभावाप्रमाणे भाव मिळावा यासाठी माजी आमदार जयवंतराव जगताप, आमदार संजयमामा शिंदे यांची सुचना, प्रयत्न, सहकार्य व मार्गदर्शनानुसार सदरचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करत असल्याची व यासाठी जिल्हा मार्केटींग अधिकारी बी. बी. वाडीकर यांचे मोलाचे सहकार्य झाल्याची माहिती सुजीत बागल यांनी दिली. तरी जास्तीत जास्त शेतकर्यांनी नोंदणी करून लाभ घ्यावा असे आवाहन देखील बागल यांनी केले आहे.




