-->
करमाळाराजकिय

करमाळा पं.स.सभापती निवडीला स्थगिती; पाटील गटाच्या जल्लोषावर विरजण; ‘काय’ झाले नेमके..? वाचा सविस्तर

ॲड. राहुल सावंत यांनी आजच्या सभापती निवड प्रक्रिया वर आक्षेप घेत केली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

 

करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

करमाळा पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागी आज दि.१ जुलै रोजी सभापती पदाची निवड प्रक्रिया होती. सभापती पदासाठी करमाळा तालुक्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील गटाचे पंचायत समिती सदस्य पै. अतुल पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने यावेळी पाटील यांची निवड निश्चित झाल्याची चर्चा सुरू झाल्यामुळे पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. त्यानिमित्त त्यांचे सत्कार होऊ लागले. पण अचानक सावंत गटाचे नेते, पंचायत समिती सदस्य ॲड. राहुल सावंत यांच्या आक्षेपामुळे व जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीमुळे पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या जल्लोषावर विरजण पडले.

 

पंचायत समितीच्या काही सदस्यांना सभापती निवडीची नोटीस ही तीन दिवसांपूर्वी मिळाली होती. नियमाप्रमाणे सदर निवडीची नोटीस ही सर्व सदस्यांना आठ दिवस अगोदर मिळणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नाही अशी तक्रार ॲड. राहुल सावंत यांनी मा. जिल्हाधिकारीसो यांच्याकडे करत या निवड प्रक्रियेवर आक्षेप घेतला. सदरची तक्रार ग्राह्य धरत मा. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशाने करमाळ्याचे तहसीलदार समीर माने यांनी आजच्या निवड प्रक्रियेला स्थगिती देऊन परत सर्व सदस्यांना नोटीस देऊन ९ जुलै पर्यंत सभापती निवड प्रक्रिया पुढे ढकलली आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close