प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


१९ फेब्रुवारी २०२२ रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९२ व्या जयंती निमित्त पुनवर ता. करमाळा येथे आज पासून सलग तीन दिवस विविध उपक्रमाने शिवजयंती महोत्सवाला सुरुवात होत आहे. या शिवजयंती महोत्सवाचे आयोजन राजा शिवछत्रपती मित्र मंडळ, पूनवर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या शिवजयंती महोत्सवामध्ये शनिवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ०९:०० वाजता गावामध्ये शिव पालखी सोहळा होणार आहे. तर रविवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी सायं. ०६:०० वाजता गावात शिवजयंती उत्सव सनई वाद्याच्या स्वरात साजरा करण्यात येणार आहे. तसेच सोमवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी रात्री ०९:०० वाजता शिवव्याख्याते ह.भ.प. सुशेन महाराज नाईकवाडे यांचे “धगधगता इतिहास मराठ्यांचा” या विषयावर कीर्तन होणार आहे.
दिनांक १९ फेब्रुवारी व २१ फेब्रुवारी रोजी समस्त गावकऱ्यांनी आपल्या दारात रांगोळी काढून व रात्री पणती लावून शिवमहोत्सव साजरा करावा. तसेच पूनवर गावातील व पंचक्रोशीतील सर्व शिवभक्तांनी या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे.



