-->
करमाळाकृषी विषयकराजकिय

स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी स्वाभिमानी ला बदनाम करू नका अन्यथा..; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

मकाईवरील दंडा विरोधात जाणाऱ्या शिवसेनेला शेतकऱ्यांच्या उसबिलासाठी मुख्यमंत्री दिसले नाहीत का..? स्वाभिमानीचा शेतकरी संघटनेचा सवाल

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

 

 

करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याने विनापरवाना उसाचे गाळप केल्याप्रकरणी या कारखान्याला साखर आयुक्तांनी ५ कोटी 63 लाख २ हजार ५०० रुपये दंड भरण्याचा आदेश दिला आहे. मकाई साखर कारखान्याला गाळप परवाना नसतानाही बेकायदेशीरपणे कारखान्याने गाळप सुरू केले आहे. यामुळे हा दंड आकारला आहे. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा काहीही संबंध नसताना कारखानदार व त्यांचे कार्यकर्ते स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बदनाम करत आहेत. हे त्यांनी थांबवावे अन्यथा गाठ स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी आहे. असा इशारा स्वाभिमानी चे तालुका अध्यक्ष सुदर्शन शेळके यांनी दिला आहे.

 

 

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, काल मकाई सहकारी साखर कारखान्यावर साखर आयुक्तांनी विनापरवाना ऊस गाळप सुरू केल्याप्रकरणी साडेपाच कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. यासाठी आता बिडी काडीवर चालनारे कार्यकर्ते म्हणतात की शेतकरी संघटनेमुळेच हा दंड झाला आहे. परंतु, हा दंड झाला म्हणजे चेअरमन यांना काहीच तोटा नाही. हा तोटा सभासदांकडूनच वसूल केला जाईल. मा. साखर आयुक्तांकडून झालेली कारवाई ही कायद्यानुसार झालेली आहे. शेतकऱ्यांना वेळीच ऊसाचे बिल दिले असते तर आज कारखाना साडेपाच कोटी रुपयांना वाचला असता. ज्यावेळी चेअरमन यांनी संघटनेच्या नेत्यांवर हात उचलला त्यावेळी ही आम्ही हेच सांगत होतो की. शेतकऱ्यांची एफआरपी पुर्ण करा अन्यथा शासन कायद्यानुसार दंड आकारला जाईल व तो शेतकऱ्यांना सोसावा लागेलं. आमची ही मागणी कारखान्याच्या MD साहेबांनी मान्य केली होती. परंतु, चेअरमन यांनी धुडकावून लावली व आम्हाला मारहान करण्याचा प्रयत्न केला. आज त्यांच्या चुकीच्या कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

 

 

 

ताटली बाटलीच्या आशेपोटी काही नौटंकीबाज कार्यकर्ते सांगतात की, कारखाना बंद करण्याचा शेतकरी संघटनेचा डाव आहे. त्यांना माझा एकच प्रश्न आहे की, तुम्हाला जर खरंच शेतकऱ्यांची एवढी काळजी आहे. तर मग ज्यावेळी बारा तेरा महीने शेतकऱ्यांना उसबिलाचे पैसे दिले नाहीत. त्यावेळी तुम्हाला शेतकऱ्यांची काळजी का वाटली नाही..? आज शिवसेना म्हणते मकाई वरील दंडा विरोधात आम्ही मुख्यमंत्री यांच्याकडे जाऊ तर आपल्याला शेतकऱ्यांच्या उसबिलाच्या पैशासाठी मुख्यमंत्री दिसले नाहीत का..? असा संतप्त सवाल ही त्यांनी यावेळी केला.

 

 

 

संघटनेमुळे मकाई बंद पडत असेल तर मग आदिनाथ कारखाना बंद करायला कोणत मांजर आडव गेलं होत का..? याच उत्तर नौटंकी बाज कार्यकर्त्यांनी द्यावे. उगाच आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बदनाम करू नका अन्यथा गाठ स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी आहे. असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close