-->
करमाळाराजकिय

तालुक्याच्या पश्चिम भागातील ‘या’ विकासकामांचे भूमिपूजन मा.आ. नारायण पाटील यांच्या हस्ते संपन्न

 

 

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

 

करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील समस्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असुन नागरिकांनी परिवर्तनाची लढाई चालू ठेवावी. असे आवाहन माजी आमदार नारायण पाटील यांनी केले आहे. करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील विविध विकास कामांचे भुमिपूजन माजी आमदार श्री. नारायण (आबा) पाटील, जि. प. सदस्या सवितादेवी राजेभोसले यांच्या हस्ते संपन्न झाले.

 

 

 

यावेळी बोलताना ते म्हणाले की, करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला जिंती-कोर्टी रस्ता माझ्या आमदारकीच्या कालावधीत झाला. आजमितीस जि. प. सदस्या सौ. सवितादेवी राजेभोसले यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या गटातील रस्ते दुरुस्तीसाठी भरघोस निधी मिळवून विकासाची गंगोत्री वाहती ठेवली आहे. आगामी निवडणुकीत जनतेने विकासाची कास सोडु नये व असेच पाठबळ कायम ठेवावे. असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. दिवसभरात तालुक्याचा पश्चिम भागातील ग्रामीण रस्ते मांजरगाव ते कोर्टी रस्ता, राजुरी ते मांजरगाव रस्ता, हिंगणी ते केत्तूर रस्ता, दिवेगव्हाण ते कुंभारगाव रस्ता, कुंभारगाव ते हिंगणी रस्ता, कुंभारगाव ते करपडी हद्द रस्ता, भिलारवाडी ते जिंती रस्ता, जिंती ते कात्रज रस्ता असा ०१ कोटी ४५ लाख रुपयांच्या निधी रस्ते कामांचे भूमिपूजन माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

 

 

 

यावेळी पंचायत समितीचे सभापती अतुल भाऊ पाटील, पं. स. सदस्या मंदाकिनी लकडे, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक देवानंदजी बागल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती जालिंदर बापू पानसरे, करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती लालासाहेब पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक नागेश काका लकडे, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक संतोष खाटमोडे-पाटील, करमाळा भाजपाचे सरचिटणीस अमरजीत साळुंखे, नरेंद्रजी ठाकूर, राजुरीचे आबासाहेब टापरे, अभियंता जगदीश पाटील, चिखलठाणचे हनुमंत सरडे, कावळवाडीचे मा. सरपंच येताळा शेजाळ, डाॅ. देवकाते, रामवाडीचे पंडित रणदिवे, रामहरी झांजुर्णे सर, बाळासाहेब कावळे, राजेंद्र भोसले, बंडू शिंदे, बंडू टापरे, नवनाथ दुरंदे, मांजरगावचे प्रा. संजय चौधरी, दशरथ चव्हाण, दादा तांबे, संतोष बागडे मेजर, रयत क्रांती संघटनेचे संभाजी रिटे, मारुती निकत, संजय निकत, केरा मोरे, अनिल पाखरे, कैलास साखरे, दादा साखरे, नामदेव बोबडे, दत्तू बोबडे, दत्तात्रय दुरंदे, अजय साखरे, दिवेगव्हाणचे अंकुश खाटमोडे, शिवाजी मोरे, गहिनीनाथ मोरे, जयसिंग शिंदे, बाळासाहेब मोरे, अतुल खाटमोडे, अभिमन्यू मोरे, दत्तात्रय खाटमोडे, बब्रुवान मोरे गुरुजी, गणपत खाटमोडे, जयसिंग शिंदे, चक्रधर पाडुळे, हिंगणीचे आबा पाटील, नितिन पाटील, रामचंद्र बाबर मेजर, नामदेव बाबर, नवनाथ काटकर मेजर, लक्ष्मण पाटील, रामचंद्र आबनावे, बळीराम गायकवाड, नवनाथ गायकवाड सर, सोमनाथ बाबर, नागनाथ बाबर, विश्वजीत बाबर, कुंभारगावचे शाहू गलांडे, पै. दशरथ पानसरे, दत्ता जाधव, शिवाजी पानसरे, घरतवाडीचे कुटे महाराज, पोलिस पाटील हरिश्चंद्र घरत, बापू घरत, दादा जगताप, भिलारवाडीचे नवनाथ अंबोधरे, उपसरपंच परमेश्वर गिरंजे, सोसायटीचे चेअरमन बापू जगताप, सचिन येडे, अमोल गिरंजे, कृष्णा काळे सर, रोहिदास गिरंजे, शिवाजी गिरंजे, युवराज गिरंजे, पोलिस पाटील शरद गिरंजे, आजिनाथ गिरंजे महाराज, ज्ञानेश्वर गिरंजे, साधू पानगे, सुभाष माने, कात्रजचे सरपंच दत्तात्रय धायगुडे, शंकर माने, भारत धायगुडे, तात्यासाहेब पाटील शेंडगे बापू, जिंतीचे वाघमोडे सर, जालिंदर राऊत, दत्ता पोटे, लतिफ तांबोळी, शाम ओंभासे, बापू धेंडे, शंकर केसकर, गणेश ओंभासे, गणेश राऊत, किरण खाटमोडे यांचेसह ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close