करमाळा
उत्तरेश्वर अन्नछत्र हॉल मधील डायनिंग टेबलचे देणगीदार महेश वासकर यांचे हस्ते पुजन
केम प्रतिनिधी/संजय जाधव


केम तालुका करमाळा येथील जागृत ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर मंदिरातील श्री. उत्तरेश्वर अन्नछत्र हाॅल मधिल स्टील डायनिंग टेबलांचे शुभारंभ व पुजन उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त श्री. भाऊसाहेब बिचितकर व अन्नछत्र देणगीदार श्री. महेश द. वासकर यांचे शुभहस्ते आज सकाळी ११.३० वाजता करण्यात आले.
याप्रसंगी उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे चेअरमन श्री. दादासाहेब गोडसे, विश्वस्त सर्वश्री अरूण वासकर, विजय तळेकर, मोहन दोंड, मनोज सोलापूरे, ग्रामस्थ श्री. संतोष जगताप, उत्तरेश्वर मंदिरातील पुजारी महेश गुरव, गणेश गुरव, राहुलआबा कोरे, संजय दोंड, श्री. रंदवे गुरुजी, ब्रम्हदेव दोंड, उत्तरेश्वर कंदरकर, संभाजी दोंड, श्री. थोपटे आणि आजच्या अन्नदान सेवेचे अन्नदाते श्री. कांबळे आदी ग्रामस्थ उपस्थितीत होते.



