-->
करमाळाविशेषसामाजिक

उत्तरेश्वर मंदिरासाठी अपंग भक्ताकडून ५१ हजाराची देणगी; केम ग्रामस्थांकडून सन्मान

 

केम प्रतिनिधी/संजय जाधव

 

केम तालुका करमाळा येथील जागृत ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या पायरी पुर्न भरण्याच्या कामासाठी केम येथील ऊत्तरेश्वर भक्त अपंग बांधव श्री. दत्तात्रय यशवंत कुलकर्णी या भाविकाने आपल्या छोट्याश्या दुकानातील कमाईतून मिळविलेले ५१०००/- हजार रूपयाची देणगी चा धनादेश ऊत्तरेश्वर देवस्थानचे चेअरमन दादासाहेब गोडसे, सदस्य अरूण वासकर, मोहन दौड, मनोज वासकर, विजय तळेकर यांच्याकडे सूपूर्त केला. याबद्दल केम ग्रामस्थांच्या वतीने युवा सेनेचे सागरराजे तळेकर, चंद्रकांत तळेकर यांच्या हस्ते कुलकर्णी यांचा फेटा बांधून, पुष्प व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

 

यावेळी मंदिराचे पुजारी गणेश गुरव, बाळू गुरव, केदार पळसकर, संग्राम तळेकर, आरिफ मुलाणी, मोदि दगडफोडे, बाळू रगडे, लालासाहेब तळेकर, तुषार शिंदे, भोंगाळे, कुरडे, भैरू शिंदे आदी ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close