-->
आरोग्यकरमाळामहिलाविषयक

केम येथे सुरक्षित “बालिका, प्रबोधित बालिका” अभियानांतर्गत कार्यक्रम संपन्न

 

 

केम प्रतिनिधी/संजय जाधव

 

 

केम तालुका करमाळा येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये “सुरक्षित बालिका, प्रबोधित बालिका” अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त सुरूवातीला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन बालिकांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

 

यावेळी ग्रामविकास अधिकारी नवनाथ सातव यानी सुरक्षित बालिका जनजागृती आपणाला कसी करायची या बद्दल त्यानी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच केम प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. विशाल जगदाळे यांनी बालिकाच्या सुरक्षेते बाबत व आरोग्य बाबत मार्गदर्शन केले व मुलीना गुलाबपुष्प व पौष्टिक आहार देऊन तिचा सन्मान केला.

 

 

 

यावेळी अंगणवाडी सेविका अनुसया लोंढे, मंगल कावळे, अंजली लोंखडे, सरस्वती कोरडे, छाया ओहोळ, सुरेखा खानट, दस पाटिल, वैशाली बिचितकर, पद्मिनी टांगडे, ताई मोहिते, सविता गवळि, रंजना कांबळे, राणी तळेकर, सविता गावडे, या शिवाय अंगणवाडी मदतनिस ऊपस्थित तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ सातव यानी केले तर आभार जगदाळे यानी मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close