
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने करमाळा येथील भाजपा संपर्क कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या २९७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
भाजपाचे करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे हे अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी बोलतांना म्हणाले की, अहिल्याबाई ह्या पहिल्या स्त्री ज्यांनी स्त्रियांची सेना बनवून नारी शक्तीचा परिचय जगाला करून दिला. एक अतिशय योग्य शासक व संघटक, न्यायप्रियता, पराक्रमी योद्धा आणि सर्वश्रुत धनुर्धर ह्या सर्व गोष्टीमध्ये पारंगत असणाऱ्या तसेच इतिहासाच्या कालपाटावर स्त्री व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणाऱ्या होळकर घराण्याचा ‘तत्वज्ञानी राणी’ म्हणून अहिल्याबाई ओळखल्या जात होत्या. त्यांचे विचार आपण आत्मसात करावे असे प्रतिपादन केले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, अमरजित साळुंखे, श्याम सिंधी, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस अमोल पवार, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत चुंबळकर, ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष धर्मराज नाळे, किरण बागल, संदीप काळे, सागर काळे, तालुका चिटणीस किरण वाळुंजकर, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष ऋषिकेश फंड, सुनील जाधव, अशोक साळुंके, जयंत काळे पाटील, दीपक चेंडगे, संजय किरवे, लक्ष्मण काळे, आप्पा वाशिंबेकर, बापू मोहोळकर, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा संगीता नष्टे, राजश्री खाडे, चंपावती कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




