-->
करमाळासामाजिक

करमाळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशांत सायं शाखेचा वार्षिकउत्सव उत्साहात संपन्न

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

करमाळा तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशांत सायं शाखेचा वार्षिक उत्सव करमाळा शहरातील महादेव मंदिराजवळ, किल्ला विभाग येथे शनिवार दिनांक ०५ फेब्रुवारी २०२२ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सव कार्यक्रमाला संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे बाल विभाग प्रमुख श्री. दिपकजी काळे (राहणार पुणे) हे प्रमुख वक्ते म्हणून लाभले होते.

 

यावेळी संघदृष्ट्या पंढरपूर जिल्ह्याचे जिल्हा कार्यवाह श्री. प्रतापसिंह टकले, जिल्हा सहकार्यवाह संदीप सावेकर, जिल्हा प्रचारक डॉ. विजयसिंह पाटील आणि जिल्हा बाल विभाग प्रमुख नाना रामनवमीवाले तसेच तालुक्यातील संघाचे तालुका कार्यवाह, सहकार्यवाह आदी संघ स्वयंसेवक व अधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात बालांचे (पहिली ते दहावी) विविध सादरीकरण (प्रात्यक्षिके) झाली. यात पद्विण्यास, नियुध्द (कराटे), समता (परेड), मानवी मनोरे (पिरॅमिड), घोष (संघाचा बँड), रोजच्या शाखेत होणारे मनोरंजक खेळ यांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. हे सर्व प्रात्यक्षिक शाखेतल्या लहान – लहान मुलांनी बसवलेली होती. तसेच शैक्षणिक आणि सामाजिक स्पर्धेत भाग घेऊन स्वयंसेवकांना भेटलेले सन्मानचिन्ह, पदक तसेच प्रशस्तीपत्रक इत्यादी चे प्रदर्शन व मुलांनी काढलेल्या विविध चित्रांचे (चित्राचा विषय – क्रांतिकारी, स्वातंत्र्य मध्ये भाग घेतलेले व्यक्ती आणि इतिहासातील राजे आणि राणी इ.) प्रदर्शन या उत्सवात लावले होते. या उत्सवाला एकूण ६० बाल, २० तरुण, २५ महिला नागरिक आणि ५० पुरुष नागरिक अशी एकूण १५५ जणांचा सहभाग होता.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close