-->
करमाळासामाजिक

ग्रामपंचायत सदस्य सरडे यांचा असाही एक आगळावेगळा वाढदिवस संपन्न

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

करंजे येथील ग्रामपंचायत सदस्य श्री. गणेशभाऊ सरडे यांनी आपल्या वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने करंजे येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. वाढदिवसाचे औचित्य साधून गावातील तरुण युवकानी शाळेत श्रमदान केले. गेल्या दीड वर्षापासून कोरोणामुळे शाळा बंद असल्याने शाळेच्या परिसरातील केर, कचरा व गवत काढून परिसर स्वच्छ केला.

याप्रसंगी भाजपा करमाळा तालुका संघटन सरचिटणीस व ग्रामपंचायत सदस्य श्री. काकासाहेब सरडे, जेष्ठ नागरिक श्री. गोकुळतात्या सरडे, अण्णासाहेब पाटील, दादा साबळे, धनाजी बाबर, अमोल गायकवाड, बाळू वैद्य, सतीश निकम, गुरु गोडगे, ओंकार सरडे, शालेय विद्यार्थि, ग्रामस्थ व युवक मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. लष्कर गुरुजी यांनी गणेश भाऊंच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना म्हणाले की, कोणत्याही अनावश्यक खर्चाला बगल देत आज शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना जे साहित्य वाटप केले त्याबद्दल गणेशभाऊं सरडे यांचे सर्व प्रथम अभिनंदन आणि शुभेच्छा. व्यक्तीचे जीवन जर सार्थकी लावायचे असेल तर परोपकाराची जाणीव निर्माण होणे फार गरजेचे असते आणि आज गणेशभाऊंच्या रूपाने याची प्रचिती येते. बालकांच्या आशीर्वादरुपी प्रेमाने आपल्याला परमेश्वर काहीच कमी पडू देणार नाही. शेवटी शाळेतील श्री. शहापुरे सर यांनी सर्वांचे आभार मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close