-->
आरोग्यकरमाळाविशेष

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ग्रामीण भागातील शाळा बंद करायला हव्यात- प्रवीण अवचर

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

गेल्या महिनाभरापासून कोरोना चा नवीन व्हेरीयंट ओमिऑक्रोन चे रुग्ण देशात वाढायला सुरवात झाली होती. मात्र, या महिन्यामध्ये राज्यात कोरोना चा उद्रेकच झाला आहे. दैनंदिन रुग्णसंख्या ही अडीच पटीने वाढू लागली आहे. जागतिक आरोग्य संघटने कडूनही कोरोणाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत देण्यात आले आहेत.

 

याच पार्श्वभूमीवर राज्यातील मोठ्या शहरात पहिली ते आठवी व कॉलेज बंद करण्यात आले आहेत. मग शहरात जर कोरोना चा शिरकाव होत असेल तर ग्रामीण भागात होणार नाही का.?
असा अर्धवट निर्णय घेणे राज्य सरकार ला कितपत योग्य वाटतय जरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत कोरोना चा धोका कमी असेल तरी त्यांचे पाल्य हे कामानिमित्त शहराचे ठिकाणी ये जा करतात. मग जर त्यांचे पासून मुलांना संसर्ग झाला आणि ते मूल शाळेत आले तर त्या एका मुलामुळे इतर मुलांना पण संसर्ग होऊ शकतो.

 

 

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा मध्ये कोरोना नियम पाळले जातात की नाही याबाबत शंका आहे. अगोदरच लहान मुलांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचा जास्त धोका आहे. या सर्व बाबींचा विचार करून राज्य सरकार व जिल्हाधिकारी यांनी ग्रामीण भागातील शाळेबद्दल ताबडतोब निर्णय घ्यायला हवा. अशी अनेक पालकांची मागणी आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close