-->
करमाळाराजकिय

जेऊर येथील व्यापाऱ्यांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार- गणेश चिवटे

 

करमाळा/प्रतिनिधी

 

भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुरू असलेल्या मोदी @9 जनसंपर्क अभियानाच्या निमित्ताने भाजपाचे करमाळा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनी रविवार (दि.२५ जून) रोजी जेऊर येथे भुषण लुंकड यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थित व्यापारी व ग्रामस्थ यांच्याशी ते बोलत होते.

 

या प्रसंगी जेऊर येथील सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन स्थानिक, व्यावसायिक व दळण वळणाच्या दृष्टीने काही महत्वाच्या अडी- अडचणी चिवटे यांच्या समोर मांडल्या असता त्यांनी या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी उपस्थितांना दिले.

 

यावेळी ग्रामपंचायत सदस्य विनोद गरड, माजी ग्रामपंचायत सदस्य मुबारक फकीर, सुवर्णकार अध्यक्ष अमोल महामुनी, प्रवासी संघटनेचे व नाभिक संघटनेचे अध्यक्ष सुहास सूर्यवंशी, प्रतिष्ठित व्यापारी प्रवीण अशोक माळवे, अतुल घाडगे, भूषण लुंकड, रवी माळवे, गणेश आमृळे, नितीन मंडलेचा, प्रवीण करे, बाबू महामुनी, दत्ता मारकड, नितीन घोडके, अक्षय किरवे, गाईंवर पेंटर, शेख साहेब, ओंकार वेदपाठक यांसह जेऊर येथील नागरिक उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close