
करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची निवड कार्यक्रम बुधवार दिनांक २३ फेब्रुवारी रोजी करमाळा तालुक्याचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांच्या करमाळा येथील संपर्क कार्यालयात पार पडला. यावेळी निमगाव हवेली येथील श्री भरत सिद्धेश्वर जगदाळे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या करमाळा तालुका उपाध्यक्षपदी निवड झाली. यावेळी आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते नूतन उपाध्यक्ष भरत जगदाळे यांचा सत्कार करून निवडीचे पत्र देण्यात आले. सदर निवड कार्यक्रम हा आमदार संजय मामा शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात संपन्न झाला.
या निवडी प्रसंगी बोलताना नूतन उपाध्यक्ष म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे व राष्ट्रवादी पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी व विद्यार्थ्यांवरील होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे.
या निवडीबद्दल निमगाव(ह.) ग्रामस्थांच्यावतीने माजी जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब निळ सर यांनी भरत जगदाळे यांचा सत्कार केला. यावेळी श्रीराम नीळ, नितीन जगताप, सिद्धेश्वर जगदाळे, हनुमंत जगदाळे, हनुमंत निळ, गणेश नीळ, संतोष जगताप व ग्रामस्थ उपस्थित होते.



