मलवडी येथील जि.प.प्रा. शाळेत बालिका दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा
केम प्रतिनिधी/संजय जाधव


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलवडी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी मी सावित्री व जोतिबा बोलतोय- विद्यार्थी मनोगत, महिला – किशोरी मनोगत, विद्यार्थी वेशभूषा, शिक्षणाचे महत्त्व यावर मार्गदर्शन, विद्यार्थी कलाविष्कार, बाल नाटिका, सर्व मुली- किशोरी- महिला यांच्या विविध स्पर्धा, अल्पोपहार असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी गावाच्या सरपंच सौ. मनिषा प्रमोद कोंडलकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. केशर भैरु दुरगुळे, सौ. राणी दशरथ मंगवडे, सौ. स्वाती दादासाहेब बादल, सौ. सुनिता रमेश काळे, सौ. प्रियंका कांतिलाल मेंढे, सौ. निता शरद पालवे या सर्व शाळा व्यवस्थापन समिती महिला सदस्या सह ग्रा.पं.सर्व सदस्या, किशोरी व महिला, माता पालकवर्ग, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर्स, बचतगट महिला, ग्रामस्थ, सर्व ग्रा.पं.- शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालकवर्ग, ग्रामसेवक, शिक्षक वर्ग आदी भरपूर संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका रंजना पाटेकर-तळेकर, शंकर ननवरे, केशव देवकर, अलिम शेख, रेवणनाथ देवकर, राणी सातव आदींनी परिश्रम घेतले.




