
करमाळा/प्रतिनिधी


केम (ता. करमाळा) येथील श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज गुरुवार दि. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनी दिलीप तळेकर व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांची विशेष उपस्थिती होती. ध्वजारोहण केम गावचे सरपंच आकाश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दयानंद तळेकर आणि शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनी विभाग स्तरीय थाळीफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या ओंकार धनंजय घाडगे या विद्यार्थ्याचा व त्याचे पालक धनंजय घाडगे यांचाही सत्कार करण्यात आला.
श्री उत्तरेश्वर देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब गोडसे, राहुल आबा कोरे केम ग्रामपंचायत सदस्य डॉ. जांभळे, किरण तळेकर, रघुनाथ तळेकर (मेजर), धनंजय घाडगे, प्रहारचे अध्यक्ष संदीप तळेकर, कैलास सुरवसे सर शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा उज्वला संदीप तळेकर, सर्कल भाऊसाहेब, विकास कळसाईत, सचिन रणशृंगारे, मुलानी चाचा, युवराज तळेकर, पोलीस अधिकारी जाधव साहेब, मनोजकुमार सोलापूरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या खाऊसाठी दत्तात्रय कुलकर्णी यांनी देणगी दिली. विद्यार्थ्यांनी लॉन्ग मार्चिंग परेड केली. विद्यालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी भात, सांबर व लापशी अल्पोपहार देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाघमारे के. एन सर यांनी केले तर आभार कोंडलकर सर यांनी मानले. प्रशालेचे मुख्याध्यापक कदम एस बी सर, पर्यवेक्षक सांगवे बी व्ही सर यांच्या मार्गदर्शनानुसार प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.



