-->
करमाळाविशेष

मलवडी येथील जिल्हा परिषद शाळेस गटविकास अधिकारी राऊत साहेब यांची भेट

 

 

केम प्रतिनिधी/संजय जाधव

 

 

करमाळा तालुक्यातील मलवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस करमाळा पंचायत समिती चे गटविकास अधिकारी श्री. मनोज राऊत साहेब यांनी सोमवार दिनांक २७ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १०:०० वाजता भेट दिली.

 

 

श्री. राऊत साहेब यांनी शालेय परिसर, पाण्याची सुविधा, शौचालय, सायन्स हाॅल, वर्ग आदि पाहणी केली. शालेय विकास आराखडा व वित्त आयोग यावर ग्रामसेवक व सरपंच यांच्या सोबत चर्चा केली. या नंतर जोहान्स केपलर व लुई पाश्चर या शास्त्रज्ञांची जंयती त्यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थांनी O.H.P. च्या साहयाने शास्त्रज्ञांची माहिती पाहिली. तसेच, सायन्स हाॅल, स्वच्छ शाळा, सुंदर शाळा, शालेय परिसर या विषयी पाहणी करून राऊत साहेबानी मार्गदर्शन केले व त्यानी शाळेच्या कामकाजाचे कौतुक केले.

 

 

 

यावेळी मुख्यध्यापिका श्रीमती रंजना पाटेकर, तळेकर मॅडम, मलवडी गावचे सरपंच प्रमोद कोंडलकर, युवा नेते सतिश कोंडलकर, ग्रामसेवक दौंड भाऊसाहेब, ऊपशिक्षक शंकर ननवरे, केशव देवकर, अलीम शेख, रेवनाथ देवकर, राणी सातव, उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव देवकर यानी केले. तर आभार रेवणनाथ देवकर यानी मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close