
प्रतिनिधी/प्रविण अवचर


करमाळा तालुक्यातील मांगी गावचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते ग्रा. सदस्य मा. सुजीत (तात्या) बागल यांच्या ३१ डिसेंबर रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. यानिमित्त कोरोना लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्या सर्व नागरिकांना मोफत युनिव्हर्सल पासचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी नाव नोंदणी आवश्यक असून सदर नाव नोंदनी दि. २६ डिसेंबर २०२१ पासुन ३० डिसेंबर २०२१ पर्यंत करावी असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
गेली कित्येक वर्षे सुजित तात्या बागल यांनी स्वतःला सामाजिक कार्यात निस्वार्थपणे झोकून दिले आहे. नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणारे सुजित बागल हे राजकारणा पेक्षा समाजकारणाला जास्त महत्व देतात. आजपर्यंत तात्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. यामुळे करमाळा तालुक्यात सुजित बागल यांना एक आदर्श व्यक्ती म्हणून ओळखतात. त्यांनी दुष्काळात चारा छावणी ते मोफत पाणी पुरवठा, स्वछता अभियान, ग्रंथालय चळवळ, अनाथ गरिबांसाठी दोन वेळचे अन्न मिळावे म्हणून अन्नपूर्णा योजना राबविली आहे. तसेच निराधार लोकांना घरकुल व पेंशन मिळवून दिली. कोरोना महामारीमध्ये स्वतःची व कुटुंबाची पर्वा न करता तात्या अहोरात्र जनतेची सेवा करत होते. मास्क, सॅनिटायजर वाटप, लसीकरण, गरजू लोकांना रुग्णवाहिका पुरवणे, गरजूंना मोफत उपचार उपलब्ध करून देणे अशी एक ना अनेक प्रश्न त्यांनी सोडवले. कोणाचे लग्न असो अथवा कोणाची मयत झालेली असो तात्यावेळात वेळ काढून हजर असतात. अर्ध्या रात्री कोणाचा अडचणी चा फोन आला तरी तात्या फोन उचलणार व त्याला लागेल ती मदत करणार. रात्र न दिवस समाजसेवेत स्वतःला झोकून दिले आहे.
गेली २ वर्षे कोरोणामुळे चोहीकडे गंभीर परिस्थीती निर्माण झाली आहे. त्यामुळे तात्यांचा वाढदिवस हा वेगळ्याच पद्धतीने म्हणजे ज्यांचे कोरोणाच्या लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झाले असतील त्यांना मोफत युनीव्हर्सल पास देण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम कोरोणाचे सर्व नियम पाळून आयोजित करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी लसीकरणाच्या पास साठी नोंदणी करावी. नोंदणी करण्यासाठी १ फोटो व मोबाईल नंबर आवशक्य आहे. नोंदणी करण्याचे ठिकाण कमलाई किराणा व झेरॉक्स सेंटर मांगी बाळासाहेब नलवडे मो. नं. +९१७५८८९०७५७१ येथे नाव नोंदणी करून लाभ घ्यावा. असे आवाहन सुजीत (तात्या) बागल मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.



