-->
करमाळाराजकिय

केम भाजपा कार्यालयात स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन

 

केम प्रतिनिधी/संजय जाधव

 

 

केम येथील भारतीय जनता पार्टी च्या कार्यालयात स्वर्गीय भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी जी यांच्या ९७ व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी केमचे ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते यांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.

 

 

याप्रसंगी केम येथील ज्येष्ठ नागरिक तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि श्री उत्तरेश्वर हायस्कूल केम यांच्या नवनियुक्त शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. धनंजय सोलापुरे, दयानंद तळेकर, उपाध्यक्ष सचिन रनशिंगारे, सौ. उज्वला तळेकर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी केम शहराध्यक्ष श्री. गणेश (आबा) तळेकर यांनी यशस्वीपणे पार पाडले. यानिमित्त अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन करताना अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करताना वाजपेयींच्या कार्याची माहिती सांगितली व त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

 

 

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सोलापूर मा. अनिरुद्ध कांबळे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सागर दोंड, ए. पी. ग्रुपचे अध्यक्ष अच्युत (काका) पाटील, प्रहार संघटना करमाळा अध्यक्ष संदीप तळेकर, क्रीडाशिक्षक अमोल तळेकर सर, धनंजय ताकमोगे, विकास कळसाईत, दत्ताभाऊ तळेकर, सागर नागटिळक, ज्ञानेश्वर गोडसे, पराग कुलकर्णी, राहुल रामदासी, शंकर तळेकर, गणेश गुरव, ज्ञानेश्वर तळेकर, विलास तळेकर यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close