-->
करमाळासामाजिक

हिवरवाडी येथील शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्ष पदी अनिल पवार यांची निवड

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

हिवरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय शिक्षण समिती अध्यक्ष पदी श्री. अनिल पवार यांची निवड झाली. सदर निवड प्रक्रिया ही चिट्ठी टाकून पार पडली. यावेळी नंदू इरकर आणि अनिल पवार यांच्या नावाने दोन चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. त्यातील एक चिट्ठी लहान मुलाकडून उचलली असता त्यात अनिल पवार यांची चिट्ठी निघाल्याने त्यांची अध्यक्ष पदी निवड झाली.

शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष हे पद रिक्त असून आज फक्त अध्यक्ष पदाची निवड करण्यात आली. तसेच सदस्य म्हणून हनुमंत सुरवसे, स्वाती साळवे, चांगदेव सांगळे, अनिता इरकर, नंदू इरकर, सोनाली पवार व मनिषा मेरगळ यांची निवड करण्यात आली. नूतन अध्यक्ष व सदस्यांच्या सत्कार जिल्हा परिषद शाळेच्या वतीने शिक्षकांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी मुख्याध्यापक गभाले सर, जोशी सर, वारे सर, काळे मँडम, गायकवाड मँडम, जाधव मँडम, सरपंच अनिता पवार, पालक, नंदू इरकर, चांगदेव सांगळे, नितीन लांडगे, विक्रम साळवे, नाना पवार, बबन पवार, भाऊसाहेब पवार, हिरालाल इवरे, गणेश इवरे, भालचंद्र इवरे,राहूल इरकर, सारिका पवार इत्यादी पालक उपस्थित होते. यावेळी त्यांचे सर्वानी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या..

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close