प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


पेरणे, ता. हवेली येथील संतोष महादेव वाळके यांच्या वाढदिवसानिमित्त संतोष वाळके मित्र परिवारा मार्फत राधाकृष्ण विद्यालय पेरणे येथे भव्य रक्तदान शिबिर भरवण्यात आले. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
विविध रुग्णालयांमध्ये आज कोरोना च्या पार्श्वभूमीवर काही प्रमाणात रक्तपेढी मधील रक्ताचा साठा कमी पडू लागला आहे. पुणे शहरातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्याच्या उद्देशातुन या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. थलैसिमीय ग्रस्त, गोर गरीब रुग्णांसाठी, तसेच डेंगू रुग्णांना रक्तातील प्लेटलेट उपलब्ध होण्यासाठी हे रक्तदान शिबिर भरवण्यात आले होते. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. विशेषता युवकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अतिशय उत्साहात मोठ्या संख्येने युवकांनी रक्तदान केले. तसेच संतोष महादेव वाळके यांनी स्वतः या रक्तदान शिबिरात रक्तदान करून त्यांचे कर्तव्य पार पाडले.
या रक्तदान शिबिरमध्ये हडपसर येथील अक्षय ब्लड सेंटरचे जनसंपर्क अधिकारी महेश रणदिवे, डॉ. शिवधन सुरुशे, डॉ. प्रशांत शिगवण आदींनी या ठिकाणी सहभाग घेतला.




