प्रतिनिधी/संजय जाधव

भगवत गीता जंयतीचे औचित्य साधून करमाळा तालुक्यातील मौजे केम येथील तलाठी कार्यालयातील तलाठी प्रमोद चव्हाण व केम मंडलचे सर्कल अधिकारी किरण कुमार खराव यांना मंगळवार दिनांक १४ डिसेंबर रोजी ए.पी. ग्रुप, केमच्या वतीने भगवत गिता पुस्तिका भेट म्हणून देण्यात आली.
मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल एकादशी हा भगवंत गितेचा जंयती दिवस म्हणून साजरा केला जातो. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी ज्या दिवशी युद्धाच्या रणभूमीवर भगवान श्री कृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला जीवनाविषयक संदेश दिला, तो मार्गशीर्ष मासातील हा दिवस आहे. म्हणून या दिवशी गीता जंयती साजरी केली जाते. हा दिवस म्हणजे भारतीयांच्या जीवनात श्रेष्ठतम दिवस म्हणावा लागेल.
यावेळी ऐ.पी. ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अच्युत काका पाटील, युवा सेना अध्यक्ष सागर राजे तळेकर, विजयसिंह ओहोळ, बापुराव तळेकर, शिवाजी मोळिक, विकास पारखे, तानाजी दौंड, ढेरे दाजी, तलाठी भाऊसाहेब अच्युत कुलकर्णी, महावीर तळेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.




