प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटांमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रस्ते ,वीज, पाणी आदी मूलभूत प्रश्न आ. संजयमामा शिंदे सोडवत असल्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही. यापूर्वीच माजी आ. नारायण पाटील आणि माजी आ. बागल यांच्या गटामधून झरेचे सरपंच प्रशांत पाटील, देवळालीचे सरपंच आशिष गायकवाड, फीसरेचे सरपंच प्रदीप दौंडे, उपसरपंच संदीप नेटके, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष भरत अवताडे, नेरले येथील काकासाहेब पाटील व वडार समाज, केतुर नं.२ चे ॲड. अजित विघ्ने, राजुरीचे आर आर बापू साखरे या असंख्य कार्यकर्त्यांनी आपल्या समर्थकांसह आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात यापूर्वीच प्रवेश केलेला आहे.
मंगळवार दिनांक २९ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ०७:०० वाजता कुंभेज ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य श्री. अण्णासाहेब साळुंखे यांचेसह रनजीत कादगे, बबन कन्हेरे या ग्रामपंचायत सदस्यांसह उद्योजक महावीर शेठ साळुंखे व कुंभेज येथील असंख्य कार्यकर्ते माजी आमदार नारायण पाटील गटातून आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात जाहीर प्रवेश करणार आहेत.
सदर कार्यक्रम विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी सायंकाळी ०७:०० वाजता संपन्न होईल. सदर कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जय महाराष्ट्र तरुण मित्र मंडळ कुंभेज तसेच जनसेवा नवरात्र उत्सव मंडळ कुंभेज व समस्त ग्रामस्थ कुंभेज यांच्या वतीने करण्यात आले आहे.




