-->
करमाळाराजकियसामाजिक

प्रहार शाखेचे भव्य उद्घाटन; ‘या’ गावातील शेकडो कार्यकर्त्यांचा प्रहार मध्ये प्रवेश

कोंढार भागातील शेकडो तरुणांचा प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश

 

केम प्रतिनिधी/संजय जाधव

माढा तालुक्यातील आलेगाव खुर्द येथे सर्वसमावेशक लोकनायक, मा. नामदार बच्चु भाऊ कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या शाखेचे उद्घाटन प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर जिल्ह्याध्यक्ष मा. दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, सोलापूर शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी यांच्या शुभहस्ते व माढा तालुका उपाध्यक्ष दीपक लांडगे यांच्या नेतृत्वात तसेच असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठया जल्लोषात करण्यात आले. यावेळी कोंढार भागातील शेकडो तरुणांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला.

यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष रमेश भाऊ पाटील, प्रहार जनशक्ती पक्षाचे करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, आलेगाव खुर्द चे माजी सरपंच प्रदीप गायकवाड, हरिभाऊ माने, जिल्हा संघटक दीपक नाईकनवरे, जिल्हा सरचिटणीस श्रीपाद पाटील, जिल्हा समन्वयक पंडित साळुंखे, माढा कार्याध्यक्ष संतोष कवले, माळशिरस अपंग क्रांती चे तालुकाध्यक्ष गोरख जानकर, संपर्कप्रमुख शहाजी देशमुख, पिंटू भोसले, माळशिरस तालुका चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष संजय पोळ, दामुअण्णा माने, आलेगाव शाखा अध्यक्ष रामदास माने, उपाध्यक्ष तानाजी गायकवाड, अध्यक्ष डॉ. अरविंद गायकवाड, सचिव रामचंद्र गायकवाड, विजय शिंदे, शाखेचे सर्व पदाधिकारी व प्रहार जनशक्ती पक्षाचे रुई शाखेचे सर्व पदाधिकारी, आलेगाव खुर्द, आलेगाव बुद्रुक शाखेचे सर्व पदाधिकारी कोंढार भागातील प्रहारचे सर्व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील म्हणाले की, कोंढार भागातील जे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नावर प्रहार संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवून जो अनेक वर्षाचा आणि अनेक गावांसाठी उपयुक्त असलेला कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा प्रश्न आलेगावकर यांचे हितासाठी नामदार बच्चुभाऊ कडू महाराष्ट्र राज्य जलसंपदा मंत्री यांच्या माध्यमातून मार्गी लावणार आहे. तसेच उजनी धरणातून पुनर्वसित होऊन या गावात आलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close