
माय मराठी न्युज नेटवर्क


मुरबाड विधानसभा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने तसेच महाराष्ट्र प्रदेश महिला कांग्रेसच्या अध्यक्षा मा. संध्याताई सव्वालाखे यांच्या सूचनेनुसार आखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा, खासदार श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या ०९ डिसेंबर रोजीच्या वाढदिवसा निमित्त मुरबाड विधानसभा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा
सौ. निरजा रुपेश आंबेरकर यांच्यातर्फे बुधवार दिनांक ०८ डिसेंबर २०२१ रोजी सत्कर्म बालकाश्रम बदलापूर पश्चिम येथे दुपारी ४:०० ते ६:०० या वेळेत
प्रचंड वाढत्या महागाई वर चित्रकला स्पर्धा तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास बदलापूर व ठाणे जिल्ह्यातील सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती लाभली. हा कार्यक्रम खुप आनंदात साजरा करण्यात आला. तसेच चित्रकला स्पर्धेत सहभागी विद्यार्थांमधुन उत्कृष्ट चित्रकला करणार्या प्रथम तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली व त्यांना पारितोषिके ही देऊन गौरविण्यात आले. यामध्ये इयत्ता आठवीतील विद्यार्थी अमोल मोरे यास प्रथम पारितोषिक, इयत्ता सहावीतील विद्यार्थी ईशांत विर यास द्वितीय पारितोषिक तर इयत्ता पाचवीतील विद्यार्थी सोहम शिर्के यास तृतीय पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा श्रीमती. संघजा मेश्राम मॅडम, ठाणे जिल्हा ग्रामीण असंघटीत कामगार व कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष रूपेश आंबेरकर सर, बदलापूर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष श्री. संजय जाधव सर, बदलापूर ब्लॉक काँग्रेस कार्याध्यक्ष श्री. लक्ष्मण कुडव सर, सेवादल ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा सौ. माहेश्वरी शेट्टी मॅडम, मुरबाड विधानसभा उपाध्यक्षा सौ. मनिषा पोळ मॅडम, बदलापूर ब्लॉक काँग्रेस सरचिटणीस, श्री. सुरेंद्र भालेराव सर, बदलापूर ब्लॉक काँग्रेस उपाध्यक्ष, श्री. विठ्ठल किणीकर सर, बदलापूर ब्लॉक काँग्रेस सरचिटणीस श्री. अकबर खान सर, बदलापूर ब्लॉक काँग्रेस सदस्या सौ. शकुंतला राजगुरू, बदलापूर ब्लॉक काँग्रेसचे सन्मानीय पदाधिकारी गण तसेच सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवरांचे व स्पर्धक विद्यार्थ्यांचे निरजा रूपेश आंबेरकर यांनी आभार मानले.




