
कोरेगाव भीमा प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


हवेली तालुक्यातील पेरणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लस “हर घर दस्तक मोहीम” अंतर्गत वढू खुर्द, ता. हवेली येथील भिल्ल वस्तीत घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात आले. या लसीकरण मोहिमेला नागरिकांनी देखील भरघोस प्रतिसाद दिला असून यामुळे ग्रामीण भागात लसीकरणाला वेग येणार आहे.
या लसीकरण मोहिमेच्या अंतर्गत पहिला डोस ९८, दुसरा ३१ असे एकूण १२९ नागरिकांचे लसीकरण या पहिल्याच दिवशी करण्यात आले. या भागातील अनेक लोक कामाच्या निमित्ताने बाहेर जात असल्याने अनेकदा गावात लसीकरण असताना देखील त्यांना त्या ठिकाणी जाता येत नव्हते. या मोहिमेच्या मुळे दिव्यांग व वयोवृद्ध नागरिकांना घरात लस उपलब्ध झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त करत शासनाचे आभार मानले.
कोविड लसीकरण मोहीम राबविण्यासाठी सरपंच मोहिनी सचिन भोंडवे, उपसरपंच सीमा भंडलकर, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र खांदवे, कोमल धुळे यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले. तर पेरणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलिमा इनामदार, डॉ. प्रज्ञा घोरपडे, डॉ. प्रियांका कोलते सातव, फुलगाव आरोग्य उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी माहेश्वरी नागरे, आरोग्य निरीक्षक अण्णासाहेब कोकडे, आरोग्य सहाय्यीका विमल गव्हाणे, आशा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपकेंद्र फुलगावच्या आरोग्य सेविका सविता पवार, आरोग्य सेवक सचिन बुगे, आशा स्वयंसेविक अश्विनी भोंडवे, वैशाली कंद, महेश झिरपे यांनी महत्वपूर्ण योगदान दिले.




