-->
करमाळाक्राईमतंत्रज्ञान

श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज येथे ”सायबर क्राईम” या विषयावर शितल क्षीरसागर यांचे व्याख्यान संपन्न

 

 

केम प्रतिनिधी/संजय जाधव

 

करमाळा तालुक्यातील श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज, केम येथे सायबर क्राईम या ज्वलंत विषयावर सौ. शितलताई क्षीरसागर यांचे व्याख्यान संपन्न झाले. यावेळी प्रथम परमपूज्य बापूजी साळुंखे यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यांनतर कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

 

 

यावेळी बोलताना सौ. शितलताई क्षीरसागर यांनी सांगितले की, आजच्या आधुनिक काळातील वाढते सायबर गुन्हे, त्याची तीव्रता, त्याचे होणारे दुष्परिणाम व त्यास घालण्यात येणारा प्रतिबंध याविषयीची सखोल माहिती महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न उत्तरे विचारून ग्रामीण भागातील विशेषत मुलींना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्यावर समाधानकारक उपाय सांगितले. यावेळी कु. संस्कृती बागल यांनी व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम यांचे फायदे तोटे तसेच वाढते गुन्हेगारीकरण याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी श्री. विकास कळसाईत यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे, मोबाईल मधून पैसे कट होणे याविषयी मार्गदर्शन केले.

 

 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री. विष्णू कदम यांनी श्री उत्तरेश्वर जुनियर कॉलेज मधील विविध उपक्रम सांगून ग्रामीण भागात या कॉलेजने यशस्वी भरारी घेतल्याचे सांगितले. यावेळी प्रा. डॉ. मच्छिंद्र नागरे यांना विविध आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्यामुळे करमाळा तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने त्यांचा या कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात आला.

 

 

या कार्यक्रमास केम मधील युवा नेते श्री. सागरराजे तळेकर, श्री. विकास कळसाईत, श्री. सचिन रनशुंगारे, श्री. ज्ञानदेव क्षिरसागर, प्रा. अमोल तळेकर, कु. स्नेहल अवचर, सौ. पल्लवी रनशुंगारे, कु. प्राची ओव्हाळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. मच्छिंद्र नागरे, सूत्रसंचालन प्रा. संतोष साळुंखे तर आभार प्रदर्शन प्रा. संतोष रणदिवे यांनी केले. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा व ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close