-->
करमाळाराजकिय

खा. निंबाळकर यांचा करमाळा तालुक्यात अतिवृष्टी बाधित भागाचा पाहणी दौरा

 

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

करमाळा तालुक्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या केम परिसरात माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पाहणी केली. तसेच संबंधित विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले.

 

 

संपूर्ण करमाळा तालुका अतिवृष्टी बाधित झाला आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केम परिसरातील शेतकऱ्यांनी खासदार निंबाळकर साहेबांकडे केली आहे. यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून संपूर्ण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले.

 

यावेळी तहसीलदार समीर माने साहेब, भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, केमचे सरपंच अजित तळेकर, कृषी अधिकारी वाकडे साहेब, करमाळा पोलीस स्टेशनचे साने साहेब, भाजपा उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, बाळासाहेब कुंभार, अशोक ढेरे, अमोल पवार, सर्व मंडळाचे सर्कल, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच तसेच केम येथील गणेश तळेकर, सागर नागटिळक, धनंजय ताकमोगे, विकास कळसाईत आदी शेतकरी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close