-->
करमाळासामाजिक

‘या’ संघटनेच्या वतीने स्मशानभुमी करण्याच्या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा

 

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

 

करमाळा तालुक्यातील पांडे येथील स्मशानभूमीच्या मागणीसाठी भिमदल संघटनेच्या वतीने शुक्रवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी १२:०० वाजता करमाळा बायपास रस्ता येथे रस्ता रोको आंदोलन करण्यासंदर्भात मा. तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे.

 

सदर निवेदनात म्हटले आहे की, पांडे ग्रामपंचायतीच्या जागेत आणि महसूलच्या जागेत शेतकऱ्यांनी केलेले अतिक्रमण काढुन स्मशानभुमीचे बांधकाम करावे. तसेच, पांडे गावातुन मरिमाता मंदिराकडे जाणारा रस्ता दुरुस्त करावा, कोल्हे वस्तीसह सार्वजनिक ठिकाणे, पाणंद रस्ते मोकळे करावेत. सर्वात महत्वाचा सार्वजनिक प्रश्न म्हणजे, पांडे येथील स्मशानभूमीचा मुद्दा अनेक वर्षांपासून आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून जवळ जवळ ७५ वर्षे झाले. अजुन ऐवढ्या मोठ्या गावात स्मशान भुमी नाही ही एक लाजीरवाणी बाब आहे. अनेक ठिकाणी स्मशान भुमी बांधण्यासाठी जागा आहे. परंतु, ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत आणी मासिक मिटिंगमध्ये यावर नुसती चर्चा केली जाते. परंतु ठोस निर्णय घेतला जात नाही. याला गावकारभारी व येथील तथाकथित स्वतःला कार्यकर्ते म्हणुन घेणारे पदाधिकारी जबाबदार आहेत. स्मशानभूमीचा विषय फक्त एखाद्याची मयत झाल्यावरच निघतो इतर वेळी यावर कोणीच बोलत नाही. अनेक वेळा मयताचे अंत्यसंस्कार करमाळा कुर्डुवाडी रस्त्यावर केले तरीही क़ोणाला जाग येत नाही. आता जी स्मशानभुमीची शिल्लक जागा आहे त्यावर ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेले आहे तेथील जागेत पुर्वीपासून अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. तिकडे मयताला घेऊन जाताना, काटेरी झुडपातुन, दगड धोंड्यातुन, वाकडी वाट करून जावे लागत आहे. म्हणुन प्रशासनाने याकडे जातीने लक्ष घालून स्मशानभुमीतील अतिक्रमण हाटवुन सर्पुण जागा रिकामी कराण्याच्या मागणीसाठी, दिनांक २३/११/२०२१ वार शुक्रवार रोजी करमाळा बायपास येथे १२:३० वाजता भिमदल संघटनेच्या वतीने कोरोनाच्या नियमाचे पालन करून रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. यांची संपुर्ण जबाबदारी प्रशासनावर राहिल याची नोंद घ्यावी.

 

 

या निवेदनातच्या प्रती जिल्हाधिकारी सोलापूर, पोलीस अधीक्षक सोलापूर, करमाळा तहसीलदार, पोलीस निरीक्षक करमाळा, सभापती करमाळा पंचायत समिती, गटविकास अधिकारी करमाळा, मंडळाधिकारी अर्जुननगर सर्कल यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी भिमदल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील भोसले, भिमदल संघटनेचे महादेव भोसले, माजी ग्रामपंचायत सदस्य मारूती भोसले, गौतम भोसले, विनोद कसबे, भिमराव भोसले, माजी ग्रामपंचायत सदस्य आप्पा भोसले, प्रा. बाळासाहेब भोसले, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close