पाथुर्डी येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील ‘या’ लाभार्थ्यांच्या घरकुलाचा गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न
केम प्रतिनिधी/संजय जाधव


करमाळा तालुक्यातील पाथुर्डी येथे महाआवास दिनाचे औचित्य साधून पंचायत समिती स्तरावरून प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना इत्यादी योजनांतर्गत मिळालेल्या पूर्ण घरकुलांचा गृहप्रवेश या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मालनबाई बाजीराव मोटे या लाभार्थ्यांच्या गृहप्रवेशाचा कार्यक्रम शनिवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी सरपंच अश्विनी मोटे यांच्या हस्ते संपन्न झाला. तसेच यानिमित्ताने नवीन घराजवळ वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी महाआवास दिन या कार्यक्रमा विषयीची माहिती पाथुर्डीचे ग्रामसेवक महेश काळे यांनी दिली. या कार्यक्रमावेळी सरपंच अश्विनी मोटे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शितलकुमार मोटे, चेअरमन संतोष मोटे, शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष धनंजय मोटे, अंकुश दरगुडे, हरिभाऊ मोटे व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.




