केम प्रतिनिधी/संजय जाधव


सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी आधिकारी मा. दिलीपजी स्वामी साहेब यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेल्या “स्वच्छ शाळा, सुंदर शाळा” या उपक्रमात केम केंद्रातील खाजगी, प्राथमिक व माध्यमिक शाळेमधून करमाळा तालुक्यामध्ये पहिल्या तीन फेऱ्यामध्ये राजाभाऊ तळेकर विद्यालय, केम यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

यावेळी बोलताना मुख्यध्यापक श्री. तळेकर सर म्हणाले की, करमाळा तालुक्यातील पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये आमच्या विद्यालयाचा दुसरा क्रमांक आला असला तरी शेवटच्या अंतिम फेरीमध्ये जिल्हा कमिटीची तपासणी होणार असून शेवटच्या फेरीत आमचे विद्यालय प्रथम क्रमांक पटकावेल. अशी ग्वाही विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मनोज तळेकर सर यांनी यावेळी दिली.
“स्वच्छ शाळा सुंदर शाळा” बनविण्यासाठी केम केंद्राचे केंद्रप्रमुख महेश कांबळे, उपमुख्याध्यापक बाळासाहेब देशमुख सर, सहशिक्षक भारत गायकवाड सर, सुरेश पवार सर, सौ. लोंढे मॅडम, श्रीमती काळे मॅडम, केमचे उपसरपंच व शिवाजी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नागनाथ तळेकर सर, महेश तळेकर सर, दत्तात्रय पवार सर तसेच श्यामकांत तळेकर, रामचंद्र तळेकर, रामदास राऊत व सर्व पालक व विद्यार्थी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.




