-->
करमाळाराजकिय

आमदार कोण? नागरिकांना प्रश्न! माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याच कामाची सर्वत्र चर्चा…

माजी आमदार शिंदे यांच्या स्थानिक विकास निधीतून ४१ ग्रंथालयांना साहित्याचे वाटप

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)

 

नोव्हेंबर २०२४ मध्ये करमाळा तालुक्यात विधानसभेच्या निवडणुकीनंतर सत्तांतर झाले खरे, परंतु विरोधी महायुतीचे सरकार राज्यात आले व महाविकास आघाडीचे आमदार तालुक्यात निवडून आले. याचा फटका मतदारसंघाला बसला असून ४ महिन्याच्या कालावधीमध्ये मतदारसंघासाठी नवीन एक रुपयाही अजून मंजूर होऊ शकलेला नाही, ही वस्तुस्थिती एकीकडे असताना दुसरीकडे मात्र माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या कार्यकाळातच मंजूर झालेली परंतु प्रत्यक्षात सुरू न झालेली एक हजार कोटी निधी असलेली कामे २०२५ मध्ये सुरू झाली असून याच कामांचा सर्वत्र बोलबाला होत असून तालुक्याचे आमदार कोण? हा सर्वसामान्य मतदारांना प्रश्न पडत आहे.

 

राशिन (ता. कर्जत) जिल्हा हद्द ते वेणेगाव (ता. माढा) या १५ गावातून जाणाऱ्या ७१ किलोमीटर लांबीचा HAM (हॅम) अंतर्गत मंजूरी मिळालेला राज्यातील सर्वाधिक लांबीच्या रस्त्याचे काम सध्या सुरू असून त्यासाठी २७१ कोटी निधी मंजूर आहे. या रस्त्याचा फायदा मतदारसंघातील सावडी, राजुरी, पोंधवडी, विहाळ, अंजनडोह, झरे, कुंभेज, कोंढेज, निंभोरे, मलवडी, केम, उपवटे, दहिवली, कन्हेरगाव, वेणेगाव या गावांसाठी होणार आहे. करमाळा तालुक्यातील कोंढार चिंचोली ते इंदापूर जि. पुणे येथील डिकसळ या भीमा नदीवरील ब्रिटिश कालीन जुन्या रेल्वे पुलानजीक पूल बांधणे – ५५ कोटी, कुगाव, ता. करमाळा ते शिरसोडी, ता. इंदापूर, जिल्हा पुणे यांना जोडणाऱ्या पूल कामासाठी ३८२.५२ कोटी निधी, करमाळा उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून १०० कॉट मध्ये रूपांतर – २५.२० कोटी, करमाळा उपजिल्हा रुग्णालय अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानासाठी १८.६८ कोटी निधी.

 

दहिगाव उपसा सिंचन योजना बंद नलिका काम – १०१ कोटी निधी मंजूर – काम प्रगतीपथावर सध्या (काम बंद) सीना नदीवरील पोटेगाव बंधारा दुरुस्तीसाठी – ४ कोटी निधी, करमाळ्यातील ऐतिहासिक भुईकोट किल्ला संवर्धन साठी – २ कोटी निधी, जलसंधारण विभाग – आवाटी, जातेगाव, कोर्टी, भोसे, लव्हे येथील तलाव दुरुस्ती कामे – १२ कोटी निधी, रायगाव व राजुरी येथील नवीन 33 kv सबस्टेशन – ६ कोटी निधी, सहाय्यक निबंधक कार्यालय इमारत बांधकाम करणे – १ कोटी ४७ लाख निधी ही कामे प्रगतीपथावर आहेत तर पर्यटन विकास विभाग – अंतर्गत संगोबा, शेटफळ, चिखलठाण व आवाटी येथे ४ कोटी निधीची कामे मंजूर – (टेंडर प्रक्रिया कामे अद्याप सुरू नाहीत), करमाळा नगरपरिषद नवीन इमारत बांधकाम, टाऊन हॉल बांधणे, श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभा करणे इत्यादी कामांसाठी १८ कोटी निधी (टेंडर प्रक्रिया कामे अद्याप सुरू नाहीत), करमाळा तहसील कार्यालय इमारत बांधकाम करणे- ३४ कोटी निधी मंजूर. (जागेच्या प्रश्नामुळे अद्याप काम सुरू नाही).

 

रस्त्याच्या मागणीसाठी लोकसभा निवडणुकीवरती बहिष्कार टाकणाऱ्या कुस्करवाडी या गावातील कुस्करवाडी ते इजीमा १२ – २ कोटी, कोर्टी दिवेगव्हन पारेवाडी रेल्वे स्टेशन ते पोमलवाडी – २ कोटी ८५ लाख, मिरगव्हाण अर्जुननगर शेलगाव क ते कोंढेज रस्ता – २ कोटी ९० लाख, पांडे शेलगाव क साडे घोटी केम रस्ता – २ कोटी, बोरगाव निमगाव गौंडरे वरकुटे रस्ता – १ कोटी, वांगी नंबर २ ते इजीमा रस्ता – २ कोटी, केतुर २ ते केतुर १ वाशिंबे सोगाव रस्ता – १२ कोटी ५० लाख, सोगाव प्रजिमा क्र. ३ – १ कोटी ७० लाख अशी ३० कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद असलेली कामे सध्या प्रगतीपथावर आहेत.

 

संजयमामांच्या या कामांचा धडाका सुरू असतानाच आमदार स्थानिक विकास निधी २०२४-२५ मधून त्यांनी तालुक्यातील ४१ सार्वजनिक वाचनालयासाठी कपाट, टेबल व खुर्ची इत्यादी साहित्य मंजूर केले होते. त्याचे वितरण ग्रंथालय प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये आज करण्यात आले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close