हवेली प्रतिनिधी/प्रविण शेंडगे


थेऊर रायगड जिल्ह्यातील महाड येथे दि. ०८ आणि ०९ नोव्हेबर रोजी ९ व्या सब जूनियर महाराष्ट्र स्टेट बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी पुणे येथील आद्य क्रांतिवीर लहुजी साळवे बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्र भवानी पेठ पुणे येथील १४ विद्यार्थी आणि १३ विद्यार्थीनी यांची निवड करण्यात आली होती.
या स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेले स्पर्धक पुढील प्रमाणे सृष्टी चोरघे, ऋतुजा खुडे, सावी तडेलकर, कस्तुरी शिंदे, खुशी तेरडल, भूमिका खिलारे, सह्याद्री वाघे, सृष्टी जाधव, सायली जाधव, रिया राजगुरू, रोज सय्यद, सैफ धोधमिये, रिया कुटे, आर्यन शिर्के, अथर्व कांबळे, सार्थक राणा, अविनाश राजवट, अविष्कार जगताप, अथर्व नाईक, निलेश औणी, ओम बापकर, तन्मय कदम, विग्नेश खलसे, प्रज्ञेश बामगुडे,तुषार जानराव, आदी सोमू, शिवम इजागत, यांची स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
राज्यस्तरीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा असल्याने सर्व विभागातील स्पर्धक यात सहभागी झाले होते. आद्य क्रांतीवीर लहुजी साळवे बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्रातील सहभागी खेळाडु पैकी भुमिका खिलारे हि रोप्य पदकाची मानकरी ठरली तर सृष्टी जाधव हि कांस्य पदकाची मानकरी ठरली, सृष्टी जाधव ही लोणी काळभोर पोलिस ठाणे अंतर्गत थेऊर पोलीस चौकी येथील पोलीस हवालदार विजय जाधव यांची मुलगी आहे.सृष्टी हिणे अगदी लहान वयात कांस्यपदकाची कमाई केल्याने सर्व स्तरातून सृष्टी जाधव हिचे कौतुक करण्यात येत आहे.
या स्पर्धेसाठी मदन वाणी सर (सेक्रेटरी बॉक्सिंग संघटना पुणे), विजय गुजर सर (इंटरनॅशनल कोच के एल वि एस पी), राम जगताप सर (इंटरनॅशनल कोच महाराष्ट्र पोलीस टीम), कैलास गायकवाड सर (राष्ट्रीय खेळाडू), अमोल सोनवणे (राष्ट्रीय प्रशिक्षक), विशाल गव्हाणे (राष्ट्रीय खेळाडू पुणे ग्रामीण पोलीस) यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.




