-->
करमाळासामाजिक

नवनाथ शिवले यांच्या वतीने आगळा वेगळा कौतुक सोहळा; दहावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांची हेलिकॉप्टरमधून गगनभरारी

 

कोरेगाव भीमा प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

श्रीक्षेत्र तुळापूर, तालुका हवेली येथील उपसरपंच व उद्योजक नवनाथ शिवले यांनी पंचक्रोशीतील तब्बल २४ गावांमध्ये दहावीच्या परीक्षेत उज्वल यश मिळवलेल्या यशस्वी २४ विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाचे कौतुक करत चक्क हेलीकॉप्टरमधून रपेट मारत पुणे जिल्ह्यात आगळा वेगळा कौतुक सोहळा केला. या नावीन्य पूर्ण उपक्रमामुळे मुलांना हेलिकॉप्टर मध्ये बसण्याची संधी मिळाली.

आकाशातून जाणाऱ्या विमान, हेलीकॉप्टरचे लहानग्यांना प्रचंड आकर्षण असते. आकाशात भरारी घेणारे विमान, हेलिकॉप्टरला जमिनीवरून पाहताना प्रत्यक्ष त्यात बसणाऱ्यांना वरून पृथ्वी कशी दिसत असेल? याचेही कुतूहल बाल मनात असतेच मात्र त्यात बसून पृथ्वी पाहण्याचे भाग्य प्रत्येकालच मिळतेच असे नाही. परंतु, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपला परिसर प्रत्यक्ष अवकाशातून पाहण्याची संधी उपलब्ध झाली.

कला, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध परीक्षांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक वस्तू, रोख रक्कम आणि आकर्षक चषक अशी बक्षिसे नेहमीच मिळतात. परंतु या हेलिकॉप्टर रपेट मुळे मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

यावेळी मराठा महासंघ पुणे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग शिवले, सरपंच गुंफा इंगळे, संजय शिवले, प्रदीप शिवले, खंडू शिवले, माजी सरपंच माऊली शिवले, शिवाजी शिवले, संतोष शिवले, ग्रामपंचायत सदस्य अर्चना पुजारी, सुरेखा शिवले, राजाराम शिवले, सुनीता शिवले, माजी चेअरमन राजाराम शिवले, हनुमंत शिवले, दिनकर शिवले, आप्पासाहेब जगताप, पांडुरंग शिवले, आबासाहेब जाधव, मच्छिंद्र ओव्हाळ, सोपान शिवले, सुखदेव शिवले, उद्धव शिवले, माजी उपसरपंच पवन खैरे, संदेश फुगे, अविनाश दौंडकर, भरत शिवले, केशव शिवले, संजय शिवले, सौरभ शिवले आदींनी यासाठी नियोजन व व्यवस्थापन केले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close