प्रतिनिधी/प्रविण अवचर


लोकनेते स्व. दिगंबरराव बागल प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची मासिक सभा संस्थेचे मावळते अध्यक्ष अशोक बरडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी सर्वांना संधी मिळावी म्हणून एकमताने जेष्ठ संचालक तानाजी धायगुडे यांनी सुचना मांडून श्री. नानासाहेब मोहिते यांची चेअरमन म्हणून एकमताने निवड करण्यात आली. सुहास कांबळे यांनी बाळासाहेब देशमाने यांची व्हा. चेअरमनपदाची सुचना मांडली व सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी अशोक बरडे यांनी पारदर्शी कामकाज केलेबद्दल सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सह पतसंस्थेचे संचालक हनुमंत सरडे यांचे हस्ते अशोक बरडे यांचा सत्कार करण्यात आला. चेअरमन नानासाहेब मोहीते यांचा सत्कार जेष्ठ संचालक तानाजी धायगुडे यांचे हस्ते व व्हा. चेअरमन बाळासाहेब देशमाने यांचा सत्कार जहाँगीर सय्यद यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना नूतन चेअरमन मोहिते यांनी सांगितले की, सर्वानी दिलेल्या संधीचा जबाबदारीने, सभासद हिताच्या दृष्टीने, सर्वांच्या सहकार्याने, पारदर्शी कामकाज करून सर्व सभासदांना जास्तीत जास्त लाभांश देण्याचा प्रयत्न करणार आहे.
यावेळी धनंजय दिरंगे, शिवाजी लोकरे, सतीष कांबळे, जयश्री माने, सुवर्णा महामुनी, शिवाजी देवकर, शहाजी देवकते, शशिकांत तळेकर, रंगनाथ देशमाने, सुहास कांबळे सर्व संचालक उपस्थित होते. आभार सचिव संतोष पोतदार यांनी मानले.



