प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


आपण आमदार झाल्यापासून तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन, कुकडी प्रकल्प तसेच कोळगाव प्रकल्प येथील या अंतर्गत सिंचन करणारे सर्व शेतकरी पाण्याच्या बाबतीत समाधानी आहेत. शेतकऱ्यांच्या प्रगतीत जोपर्यंत फरक पडत नाही. तोपर्यंत मी कामच करत राहणार आहे. जेवढी संधी तुम्ही द्याल, तोपर्यंत चांगले काम करत राहणार असून, दरवर्षी मतदार संघातील रस्त्यासाठी शंभर कोटी चा निधी उपलब्ध करणार आहे. करमाळा तालुक्यातील जनतेच्या सर्व अपेक्षा पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन आमदार संजयमामा शिंदे यांनी केले.
फिसरे येथे रविवार दिनांक ०७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर प्रवेश आणि विविध विकास कामांचे उद्घाटन सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सोलापूर जिल्हा शिवसेना उपप्रमुख भरत आवताडे यांच्यासह फिसरे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रदीप दौंडे, उपसरपंच संदीप नेटके, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत रोकडे, विजय आवताडे, गणेश ढावरे या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसोबतच गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात जाहीर प्रवेश केला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंद्रकांत सरडे, आदीनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी झोळ, महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे, विठ्ठल कार्पोरेशन चे जनरल मॅनेजर भारत रोकडे, माजी पंचायत समिती विलास पाटील, पंचायत समितीचे सदस्य दत्ता जाधव, दूध संघाचे संचालक राजेंद्रसिंह राजेभोसले, जिल्हा परिषद सदस्य उद्धव माळी, देवळालीचे सरपंच आशिष गायकवाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत पाटील, पंचायत समिती सदस्य राहुल सावंत, कन्हेरगांवचे माजी उपसरपंच धनंजय मोरे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा शितल क्षिरसागर, कार्याध्यक्ष स्नेहल अवचर, उपतालुकाध्यक्षा रूपाली अंधारे , नंदीनी लुंगारे, पै. उमेश इंगळे, गुळसडीचे माजी सरपंच मानसिंग खंडागळे, सुजित बागल, नानासाहेब मोरे, समाधान दौंड, काका पाटील, अशपाक जमादार, डॉ. विकास विर, प्रविण शिंदे गुरुजी, तात्या सरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब निळ, उदय ढेरे आदी उपस्थित होते.
यावेळी सौ. शीतल क्षीरसागर, चंद्रकांत सरडे, फिसरे चे सरपंच प्रदीप दौंडे, उपसरपंच संदीप नेटके, गौतम ढाणे, उमेश पाथ्रुडकर, राहुल सावंत, पंचायत समिती सदस्य दत्ता जाधव, राजेंद्रसिंह राजेभोसले, भरत आवताडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
भरत आवताडे म्हणाले की, मामांसारखे नेतृत्व तालुक्यात लाभले हे आमचे भाग्य असून, या भागात पाणी मिळावे. यासाठी मी आमदार शिंदे गटात प्रवेश केला आहे. काम करण्याची धमक फक्त आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडेच आहे. फिसरे गावात आतापर्यंत मामांनी ९५ लाखांचा निधी दिला आहे. सूत्रसंचालन संजय गुटाळ, धनंजय शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन भारत रोकडे यांनी मानले.




