
केत्तुर/प्रतिनिधी (उदयसिंह खाटमोडे-पाटील)


मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा दर्शवण्यासाठी उद्या रविवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी करमाळा बंदची हाक सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.
याबाबत बोलताना काही निवडक प्रतिक्रिया आम्ही घेतल्या असता मराठा समाजाचे म्हणणे आहे की, मराठा समाजाच्या मागण्या व आरक्षण न मिळण्यास पूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चाललेली आहे. त्यांच्या जीवितस काही कमी जास्त झाले तर त्याला पूर्णपणे महाराष्ट्र सरकार जबाबदार असणार आहे. रविवार दि. २२ सप्टेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून संपूर्ण करमाळा तालुका बंदचे आवाहन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. सकल मराठा समाज व बहुजन समाज यांच्या वतीने बंदच्या समर्थनार्थ करमाळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सर्वांनी सकाळी १०.०० वाजता जमावे असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे.
कायदा व सुव्यवस्था पाळून सर्वांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे, करमाळा तालुक्यातील समाजाच्या मागणीसाठी होणारे संपूर्ण गुन्हे मी व माझी मित्र मंडळींची टीम मोफत लढवणार आहे.
अँड. अजित विघ्ने




