-->
करमाळाक्राईम

सावत्र बापाची मित्राच्या मदतीने विकृती; मुलीवर अत्याचार करण्यास आईचीच सहमती

माय मराठी न्युज

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यामध्ये सावत्र बाप गेल्या वर्षभरापासून आपल्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा बाप आणि त्याचा एक मित्र या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत असल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. या सगळ्या भयंकर प्रकाराची पीडित मुलीच्या आईला माहिती असून यासाठी आईचीही सहमती असल्याचे समोर आले आहे. सावत्र बापासह अन्य एकजण आणि पीडितेची आई या तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील पीडित अल्पवयीन मुलगी १४ वर्षाची असून ती औरंगाबाद येथील एका वसतिगृहात राहून शिक्षण घेत होती. परंतु तिच्या पायाची शस्त्रक्रिया झाल्यामुळे ती शहरातील मोंढा मार्केट परिसरातील तिच्या आईकडे राहण्यासाठी आली होती. ती गेल्या वर्षभरापासून आपल्या आईसोबत राहत होती. परंतु, सावत्र बापाची या मुलीवर वाईट नजर होती. तो तिच्यासोबत वारंवार अश्लील चाळे करत होता. एवढेच नव्हे तर शेजारी राहणारा आणखी एक जणही तिचा लैंगिक छळ करत होता. याबाबत मुलीने शेजारी आणि सावत्र बापाचे हे कृत्य आपल्या आईच्या कानावर घातले तेव्हा आईने मुलीची साथ न देता शेजारी जसे सांगतो, तसे कर असे सांगितले. तसेच पीडित मुलीला मारहाण केली.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close