-->
आरोग्यकरमाळाराजकियसामाजिक

करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे डायलिसीस सेंटर मंजूर; आ. संजयमामा शिंदे यांची माहिती

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात नव्याने डायलिसिस सेंटर मंजूर झाले असून त्याचा फायदा तालुक्यातील गोरगरीब जनतेने घ्यावा असे आवाहन करमाळा मतदार संघाचे आमदार संजय मामा शिंदे यांनी केले आहे. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, यापूर्वी करमाळा तालुक्यातील रुग्णांना डायलिसिस साठी नगर, सोलापूर, अकलूज, बार्शी आदी ठिकाणी जावे लागत होते. याकामी लोकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत होता. वाहतूक खर्च व वेळही वाया जात होता. त्यामुळे आपण राज्याचे आरोग्य मंत्री नामदार राजेशजी टोपे यांचे कडे पाठपुरावा केला.

करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे २ मशीन मिळणार आहेत व त्यासाठी आवश्यक असणारा RO प्लँट व इतर आवश्यक बाबीची पूर्तता केली जाणार असून लवकरच डायलिसिस सेंटर कार्यन्वित होईल. या सेंटर मुळे सर्पदंशाने किडनी विकार उद्भवलेले, किडनी विकाराने त्रस्त असलेल्या रुग्णाला दिलासा मिळणार आहे.

 

करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयाला यापूर्वीच आमदार संजय मामा शिंदे यांच्या प्रयत्नातून मोफत सिजरियन सुविधा, डिजिटल एक्स-रे मशीन, ३० बेडची सेंट्रल ऑक्सीजन लाईन, ऑक्सीजन प्लांट, ५० कॉटचे श्रेणी वर्धन करून १०० कॉट मध्ये रूपांतर आदी सुविधा यापूर्वी झालेल्या आहेत. आता डायलिसिस सेंटर सुरू होणार असल्यामुळे याचा फायदा तालुक्यातील जनतेला होणार आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close