-->
राज्यविशेषसामाजिक

शरद वाखारे यांचा शिक्षक ते मुख्याध्यापक ३४ वर्षांचा प्रवास कौतुकास्पद व नाविन्यपूर्ण- डॉ. अशोक भोसले

 

 

प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

 

 

शिक्षक ते मुख्याध्यापक या ३४ वर्षांच्या प्रचंड कारकिर्दीत विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम, कला प्रदर्शन, गीतमंच, क्रीडा स्पर्धा तसेच स्पर्धा परीक्षेत विद्यालयातील विद्यार्थी उत्कृष्ट गुणांनी येण्यासाठी वाखारे यांचे कार्य कौतुकास्पद असून शिक्षक ते मुख्याध्यापक म्हणून त्यांचे कार्य हे नेहमीच नाविन्यपूर्ण राहिल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणेचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले.

 

 

फुलगाव, ता. हवेली येथे फुलगाव श्री शिक्षण प्रसारक मंडळाच्या हरी उद्धव धोत्रे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद वाखारे यांच्या “सेवापूर्ती व शरदोत्सव ३४” या विशेष अंकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संजय धोत्रे होते.

 

 

सेवापूर्ती निमित्ताने डॉ. अशोक भोसले, संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व संस्था चालक, फुलगाव ग्रामस्थ, विद्यार्थी यांचे उपस्थितीत शरद वाखारे व जयश्री वाखारे यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. तसेच कार्याची ओळख करून देणारा “शरदोत्सव ३४” याचे प्रकाशन करण्यात आले. वाखारे कुटूंबीयाकडून शाळेच्या विकासासाठी ५१ हजार रुपये देणगी देण्यात आली. यावेळी माजी मुख्याध्यापक जहांगीर मुल्ला, संस्थेचे अध्यक्ष संजय धोत्रे, उपाध्यक्ष नारायणराव खुळे, अँड. संजय वाखारे, आदींनी यावेळी आपली मनोगते व्यक्त केली. तर मुख्याध्यापक शरद वाखारे यांनी सत्काराला उत्तर देताना गरीब विद्यार्थ्यासाठी केलेली मदत, विद्यार्थी संख्येत शाळेत झालेले वाढ, संस्था, ग्रामपंचायत, माजी विद्यार्थी, पालक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केलेल्या सहकार्य याबद्दल आपले अनुभव व त्यांचे ऋण व्यक्त केले.

 

 

यावेळी फुलगावच्या सरपंच मंदाकिनी साकोरे व उपसरपंच ज्योतीताई गवारे, ग्रामपंचायतचे आजी माजी पदाधिकारी, माजी विद्यार्थी संदीप गायकवाड, सुनील वागस्कर, सोमनाथ वागस्कर, वामन खुळे, राहुल वागस्कर, प्रांजली खुळे व अनुष्का वागस्कर, माजी मुख्याध्यापक पंडित कुंभार, संदीप इंगवले, डॉ. प्रकाश शिंदे, उत्तम आण्णा भोंडवे अशा अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले.

 

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक सुभाष लोंढे सूत्रसंचालन लंका भिलारे व सतीश केकाण यांनी कला प्रदर्शन व रांगोळी श्रीरंग जाधव, रमेश पाटील, मनीषा वाळुंज, अपर्णा आगवणे, सोनाली साळुंखे, नम्रता गवळी, प्रणाली फुलावरे, गौरीशंकर करपे व सर्व शिक्षकेतर यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी फुलगावचे सर्व ग्रामस्थ व गावातील सर्व महिला परिसरातील सर्व माजी विद्यार्थी तसेच शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close